Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : बावीस हजार जनावरांच्या वंध्यत्वावर उपचार

Animal Infertility : जिल्हा परिषद पुणेच्या पशुसंवर्धन विभागाने गेल्या महिनाभरात एक हजार ४४९ ठिकाणी शिबिरे पूर्ण केली आहेत. जिल्ह्यात वंध्यत्वाने बाधित दुभत्या जनावरांची तपासणी करून उपचार शिबिरे घेण्यात आली.

Team Agrowon

Pune News : गाय आणि म्हैस वर्गीय जनावरांची १०० टक्के प्रजननक्षमता व्हावी, त्यांचे वंध्यत्व कमी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत महिनाभरात जिल्ह्यात गायी व म्हैसवर्गीय जनावरांचे वंध्यत्व शिबिर घेण्यात आले. यात २२ हजार २७० जनावरांवर उपचार करून वंध्यत्व निवारण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषद पुणेच्या पशुसंवर्धन विभागाने गेल्या महिनाभरात एक हजार ४४९ ठिकाणी शिबिरे पूर्ण केली आहेत. जिल्ह्यात वंध्यत्वाने बाधित दुभत्या जनावरांची तपासणी करून उपचार शिबिरे घेण्यात आली.

एक ते ३१ डिसेंबरदरम्यान यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकारातून राज्यातील गायी व म्हैस वर्गीय जनावरांच्या वंध्यत्वावर मात करण्यासाठी ही संकल्पना राज्यात राबविण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यात दहा लाख ८३ हजार गोवर्गीय जनावरे आहेत. यातील आठ लाख ११ हजार १०३ गाय वर्गातील आहेत. तर दोन लाख ७२ हजार २०५ जनावरे म्हैस वर्गातील आहेत. यातील वंध्यत्वाचा त्रास असणाऱ्या २२ हजार २७० गायी आणि म्हशींची तपासणी करून उपचार करण्यात आले.

जिल्ह्यात वंधत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गायी- म्हशींची संख्या मोठी आहे. या सर्व जनावरांसाठी शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरात गायी-म्हशींच्या प्रजनन, माजाचे चक्र, लक्षणे, म्हशींमधील मुका माज, कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, वंधत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम, आरोग्य तपासणी आदींचे आयोजन केले.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Crop Insurance: वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मिळणार पीक विमा योजनेतून भरपाई; केंद्र सरकारचा निर्णय

Cattle Ear Tagging: ईअर टॅगिंग नसल्यास जनावरांची खरेदी-विक्री नाही; श्रीकृष्ण घुमरे

Sugarcane Price Demand: पस्तीसशेची पहिली उचल जाहीर करा; अन्यथा आंदोलन!

Kolhapur Politics: ‘अदृश्य शक्तीचा हात...; एकत्र आलोय, कायम एकत्र राहण्यासाठी’; कट्टर विरोधक मुश्रीफ-घाटगेंची युती

Crushing Season: लोकशक्ती पहिल्या गाळप हंगामासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT