Team Agrowon
संसर्गाने होणारे बरेचसे रोग या तपासणीद्वारे तपासता येतात. रक्तातील घटक जसे लोह, पीसीव्ही, एमसीव्ही, एलएफटी, केएफटी या चाचण्या शरीरक्रियामधील दोष ओळखण्यास उपयुक्त ठरतात.
यामध्ये एक्स रे,अल्ट्रासोनोग्राफी यासारख्या आधुनिक तंत्राद्वारे हाड मोडणे, शरीरातील अंतर्गत भागाच्या चाचण्या,श्वासनलिका, पोट यामधील अनावश्यक बाबींची तपासणी करून शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात.
याद्वारे रक्तातील जिवाणू, आदिजीव यांचा संसर्ग काचपट्टी घेऊन सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहता येतो. तसेच रक्तातील पेशींची संख्यासुद्धा तपासात येते, जेणेकरून योग्य ती उपाययोजना करता येते.
सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत रक्ताचे कृत्रिम अन्नघटकांवर निर्जंतुक पद्धतीने संवर्धन केले असता रोगास कारणीभूत ठरणारे जिवाणू वेगळे करून उपचारासाठी योग्य प्रतिजैविके निवडता येतात.
पेशीपुंजके बनविणे, साका बनविणे, पेशीआवरण फाडून पेशीतील हिमोग्लोबिनचे रक्तद्रवात विद्रावण करणे या तीन प्रकारच्या क्रियांवर रक्तजलशास्त्र विभागात होणारी बहुतेक सर्व परीक्षणे आधारलेली असतात.
जनावराच्या शरीरातील पचनसंस्था, इतर अवयवातील परोपजीवी जंत, जंतांची अंडी यांचे परीक्षण करण्यासाठी शेणाची परीक्षा करणे गरजेचे असते.
मूत्र तपासणीसाठी प्रथमतः जनावराचे सुरवातीचे थोडे मूत्र गोळा करू नये. थोडेसे मूत्र वाहून गेल्यानंतरचे मूत्र टोल्युन किंवा थायमॉल असणाऱ्या निर्जंतुक काचेच्या बाटलीत गोळा करावे.