Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ची व्याप्ती वाढली

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन (Nanded District Administration) दक्ष आहे. नांदेड तालुक्यातील वाघी व देगलूर तालुक्यातील तमलूर या गावात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील वाघी तसेच देगलूर तालुक्यातील तमलूर येथील पशुधनामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा आजार निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, आजार अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे.

भारत सरकारचा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. परदेशी यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

लम्पी स्कीन आजार प्रादुर्भावग्रस्त व बाधित झालेली नांदेड तालुक्यातील वाघी व देगलूर तालुक्यातील तमलूर ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून ५ कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT