Lumpy Skin : कोल्हापुरात शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. २५) शंभर टक्के जनावरांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : जिल्ह्यात ५ तालुक्यांतील ५२ गावांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) झाला आहे. आतापर्यंत ४०७ जनावरांवर उपचार (Lumpy Treatment) सुरू असून, २९ बाधित जनावरांचा मृत्यू (Animal Death Due To Lumpy Skin) झाला आहे.

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. २५) शंभर टक्के जनावरांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. लसीकरणासाठी व आजारावर नियंत्रणासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : लाख मोलाच्या खिलारवर ‘२४ तास’ लक्ष

पशुपालकांनी लम्पी स्कीनबाबत प्रश्न अथवा शंका असल्यास संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी केले.

लम्पी स्कीनसदृश लक्षणे गोवर्गीय पशुधनामध्येच दिसत आहेत. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पशुपालकांनी खासगी पशुवैद्यकांशी संपर्क केला तरी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना अथवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

शासनाकडून लम्पी स्कीन संबंधीचे सर्व उपचार मोफत देण्यात येत आहेत. याबाबतही काही प्रश्न असतील तर पशुधन विकास अधिकाऱ्यांसह टोल फ्री क्रमांक १९६२ यावरही संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com