The outbreak of 'Lumpy Skin' increased in Khandesh Agrowon
काळजी पशुधनाची

lumpy skin disease : ‘लम्पी स्कीन’चा खानदेशात प्रादुर्भाव वाढला

सहा तालुक्यांत समस्या अधिक; लसींचा तुटवडा कायम

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात ‘लम्पी स्कीन’ (lumpy skin disease) आजाराचा पशुधनातील प्रकोप वाढला आहे. पशुधन विलगीकरणाची सुविधा कुठेही नाही. स्वतंत्र छावण्यांची गावोगावी गरज आहे. यातच लसींचा तुटवडा आहे. शासनाकडून कुठेही पुरेशी लसींची व्यवस्था झालेली नसल्याची स्थिती आहे.

लम्पी स्कीन जळगावमधील रावेर, यावल, पारोळा, अमळनेर, धुळ्यातील साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर भागात अधिक आहे. या भागात गावोगावी किंवा महसूल मंडलांत दोन पशुधन छावण्या किंवा विलगीकरण कक्ष तयार करण्याची गरज आहे. संसर्ग झालेल्या पशुधनाचे लसीकरण शक्य नाही. परंतु संसर्ग न झालेल्या पशुधनाचा बचाव करण्यासाठी विलगीकरण, जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी लसीकरणही गावोगावी वेगात सुरू करण्याची गरज आहे. परंतु लसीकरण गावोगावी सरपंच किंवा दात्यांकडून केले जात आहे. प्रशासनाकडे लसींचा तुटवडा आहे. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग ही समस्या रोखण्यास अपयशी ठरला आहे. पर्यवेक्षक, पशुवैद्यक यांची संख्या कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी पशुवैद्यकांच्या मदतीने लसीकरण करून घ्यावे लागत आहे.

खानदेशात सध्या पशुधनाचे बाजार बंद आहेत. परंतु बाजार सुरू असतानाच या रोगाचा फैलाव गावोगावी झाला. हा फैलाव रोखण्यासाठी उपचार वाढविण्यासह सक्षम यंत्रणेची गरज आहे. परंतु यंत्रणेचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यातच पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने पिकांची हानी होत आहे. दुसरीकडे गोठ्यात पशुधनाची हानी होत आहे.खानदेशात ‘लम्पी स्कीन’च्या समस्येने आतापर्यंत सुमारे ५० पशुधन मृत्यूमुखी पडले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून मदतीची गरज आहे. परंतु मदत अद्याप काही शेतकऱ्यांनाच मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT