Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Poisoning : जनावरांतील बुरशीजन्य विषबाधेची लक्षणे

Animal Disease : काही बुरशींपासून दुय्यम पदार्थ तयार होऊन त्यापासून जनावरांना विषबाधा होते. अशा प्रकारची विष बाधा जास्त प्रमाणात झाल्यास काहीवेळा मृत्यू देखील होतो.

Team Agrowon

डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. विकास कारंडे

काही बुरशींपासून दुय्यम पदार्थ तयार होऊन त्यापासून जनावरांना विषबाधा होते. अशा प्रकारची विष बाधा जास्त प्रमाणात झाल्यास काहीवेळा मृत्यू देखील होतो. जनावरांना काही वेळा अफ्लाटॉक्सीनसारखी बुरशीजन्य विषबाधा होते.

१) बुरशीजन्य विषबाधेचा प्रसार हा संसर्गजन्य आजारासारखा एका जनावरांपासून दुसऱ्या होत नाही. बुरशीजन्य विषबाधा ही विशिष्ट ऋतूमध्ये दिसते.

२) बऱ्याच बुरशी जनावरांची प्रतिकारशक्ती कमी करतात. त्यामुळे अशी जनावरे जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजारांना बळी पडतात.

३) बुरशीजन्य विषबाधेवर प्रतिजैविकांचा परिणाम होत नाही.

४) काही बुरशीची वाढ विशिष्ट पशुखाद्यामध्ये होते.

अफ्लाटॉक्सीनची विषबाधा ः

जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीनमुळे होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण अधिक आहे. अफ्लाटॉक्सीन हा दुय्यम पदार्थ असून तो ॲस्परागस फ्लावस आणि ॲस्परागस परासायटीकास या बुरशीपासून तयार होतो. यामुळे होणारी बुरशीजन्य विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते.

याचे प्रमाण साठवलेले धन्य जसे की, गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि इतर सर्व पेंढीमध्ये अधिक प्रमाणात असते.

जेव्हा वातावरणातील आद्रता १५ टक्के आणि तापमान २५ ते ३२ अंश सेल्सिअस असते, तेव्हा धान्यामध्ये तयार झालेले अफ्लाटॉक्सीन जास्त काळ राहते. या बुरशीची वाढ पीक शेतात असताना, धान्य तयार करताना किंवा धान्याची अयोग्य साठवण केल्यास होते.

विषबधेची लक्षणे:

तीव्र प्रकार :

- जनावरांनी अफ्लाटॉक्सीनयुक्त धान्य किंवा पशुखाद्य अधिक प्रमाणात खाल्लेले असते. या प्रकारची विषबाधा अनेक जनावरांना होते. काही जनावरांचा तत्काळ मृत्यू होतो.

- जनावरे अशक्त बनतात. चारा, पाणी खात नाहीत. सुस्त बनतात.

- काही जनावरांच्या तोंड, नाक आणि शेणातून रक्त पडते. काही जनावरांना संडास लागते.

मध्यम प्रकार:

- या प्रकारची विषबाधा जनावरांच्या आहारातून हळूहळू तीन महिन्यांपर्यंत अफ्लाटॉक्सीन गेल्यास होत असते.

- जनावरांना कावीळ होते, झटके येतात. अंगाला खाज सुटते.

- शरीरांतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू होतो.

कमी प्रकार :

-जनावरांनी अफ्लाटॉक्सीन कमी प्रमाण पशुखाद्यातून सहा महिन्यांपर्यंत खाल्ल्यास विषबाधा होते.

- ही विषबाधा जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसते. जनावरांची पचनशक्ती, क्रयशक्ती कमी होते.

- तब्येत कमी होत जाते. दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते.

- गाभण जनावरांना गर्भपात होतो. प्रतिकार शक्ती कमी खूप कमी होते.

- कोंबड्यांच्या अंडी उत्पादनात घट होते. मांस उत्पादन कमी होते.

विषबाधा टाळण्यासाठी उपयोजना :

- विषबाधेवर खात्रीशीर उपचार उपलब्ध नसल्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

- बुरशीयुक्त चारा, पशू खाद्य जनावरांना खाऊ घालणे बंद करावे.

- काही शेतकरी कमी खर्चात पशुखाद्य, खुराक बनविण्यासाठी कमी प्रतीचे धान्य खरेदी करतात. हे धान्य बुरशीयुक्त नाही याची खात्री करावी.

- पिकाची कापणी, मळणी करतानाच बुरशीयुक्त चारा कापणी करताना वेगळा करून ठेवावा. तो चांगल्या चाऱ्या सोबत मिसळू नये.

- पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये.

- बुरशीयुक्त धान्याचा भरडा, मुरघास चारा जनावरांना खाऊ घालू नये.

- बाधित जनावरांना जादा प्रोटीनयुक्त पशू खाद्य द्यावे.

- बाधित जनावरांना जीवनसत्त्व ई, सेलेनीयमचा पुरवठा करावा.

- बाधित जनावरांना दुय्यम प्रकारचा आजार झाल्यास तातडीने पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

संपर्क ः

डॉ. बाबासाहेब घुमरे, ७७०९५११७४१

डॉ. विकास कारंडे, ९४२००८०३२३

(पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,

शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Condition: राज्यातील तब्बल २५५ तालुक्यांत दुष्काळ

Karnataka Drought Crisis: कर्नाटकला ५० टक्के दुष्काळी मदत तत्काळ द्या: मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Edible Oil Import Duty: खाद्यतेल आयात शुल्कात कपात

Raisin Price: बेदाणा दर टिकून; मागणी कमी

Maharashtra Weather: पूर्व विदर्भात वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

SCROLL FOR NEXT