Loan Waiver Impact: परभणी जिल्ह्यात २०२५-२६ वर्षात पीककर्जाचे नूतनीकरण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी राहिला. चालू आर्थिक वर्षात खरिपामध्ये ८५ हजार ८०० पैकी ७१ हजार ४३ शेतकऱ्यांनी ५९० कोटी रुपये पीककर्जाचे, तर रब्बीमध्ये ४७ हजार ५०६ पैकी रविवार (ता. १५) पर्यंत ६ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ६५ कोटी ५५ हजार रुपये एवढ्या पीककर्जाचे नूतनीकरण करुन घेतले. कर्जमाफीच्या अपेक्षने यंदा अनेक शेतकरी पीककर्जाचे नूतनीकरण करून घेत नसल्याचे अग्रणी बँकेच्या सूत्रांनी सांगितले..खरीप हंगाम २०२४ मध्ये १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ८५ हजार ८०० शेतकऱ्यांना ६९६ कोटी १२ लाख रुपये (४७.३२ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते. त्यात ७५ हजार ४३६ शेतकऱ्यांनी ५८६ कोटी ५४ लाख रुपये एवढ्या पीकर्जाचे नूतनीकरण केले होते. तर १० हजार ३६४ नवीन शेतकऱ्यांना १०९ कोटी ५८ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटप होते. .Crop Loan Renewal : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७२४ कोटींचे पीककर्ज नूतनीकरण नाही.खरीप २०२५ मध्ये १ हजार ५१६ कोटी रुपये उद्दिष्ट असताना ८६ हजार २१४ शेतकऱ्यांना ७८४ कोटी ३७ लाख रुपये (५१.८९ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले. त्यात ७१ हजार ४३ शेतकऱ्यांनी ५९० कोटी रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करुन घेतले होते. तर १५ हजार १७१ शेतकऱ्यांना १९४ कोटी ४३६ रुपयाचे नवीन पीककर्ज वाटप केले होते..Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली.रब्बी २०२४-२५ मध्ये ७८२ कोटी रुपये उद्दिष्ट असताना ४७ हजार ५०६ शेतकऱ्यांना ३२६ कोटी १९ लाख रुपये (४१.७१ टक्के) पीककर्ज वाटप झाले. त्यात ४२ हजार ४६८ शेतकऱ्यांनी २५४ कोटी ९० लाख रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले, तर ५ हजार ३८ शेतकऱ्यांना ७१ कोटी २९ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले..रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये ७४८ कोटी ४० लाख रुपये उद्दिष्ट असताना रविवार (ता. १५) अखेर १२ हजार ३३८ शेतकऱ्यांना १५४ कोटी ७ लाख रुपये (२०.५९ टक्के) पीककर्ज वाटप झाले. त्यात ६ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ६५ कोटी ५५ हजार १ हजार रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले, तर ५ हजार ६०५ शेतकऱ्यांना ८८ कोटी ५२ लाख ३७ हजार रुपये नवीन पीककर्ज वाटप केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेने रब्बीत नवीन पीककर्ज वाटप केल्याची माहिती अहवालात दिसत नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.