Red Urine Disease Of Animals Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Diseases : जनावरांना लाल मूत्र आजार का होतो?

लालमूत्र हा आजार गायी व म्हशीमध्ये स्फुरद या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो.

Team Agrowon

लालमूत्र हा आजार (Red Urine Disease) गायी व म्हशीमध्ये स्फुरद (Sulphur) या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. हा आजार गाभण काळाच्या (Pregnancy Period) शेवटच्या दोन ते तीन महिन्यात तसेच व्याल्यानंतर दोन ते तीन महिने कालावधीमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. गर्भाच्या वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी लागणारी स्फुरदची मात्रा व जनावरांना आहारातून उपलब्ध होणारी मात्रा यामध्ये असमतोल झाल्यास हा रोग उद्भवतो. लाल मुत्र रोग आजाराची कारणे आणि उपचाराविषयी पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहुया. 

रक्तातील स्फुरदाच्या कमतरतेमुळे रक्तातील लाल पेशीला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे लाल पेशी फुटतात. लाल पेशींची मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे त्यातील रंगद्रव्यांचा लाल रंग लघवीला येतो. त्यातून जनावरांना रक्तक्षय होतो व लाल पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्यामुळे असे जनावर रक्तक्षय होऊन दगाऊ शकते. 

जनावराची दूध उत्पादकता कमी होते. उपचार पद्धतीवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि एकूणच पशुपालकाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. या आजाराचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने म्हैस वर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.

- मातीमधील स्फुरद कमी असल्याने बहुतांश भागात या आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतो. आजारी जनावरांना पशुवैद्यकामार्फत तात्काळ योग्य उपचार करून घेतल्यास जनावरे या आजारात वाचवता येतात. 

रक्तक्षय जास्त तीव्रतेचा असल्यास आणि रक्त संक्रमणाची सुविधा नसल्यास काही जनावर दगावू शकतात. त्यामुळे असे घातक आजार टाळण्यासाठी जेव्हा जनावरांना शासन निर्णय प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. 

गाभण काळातील शेवटचे दोन ते तीन महिने व विल्यानंतरचे दोन ते तीन महिने या काळात जनावरांच्या आहारात नियमित खनिजद्रव्यांचा पुरवठा केल्यास जनावरांना अशा रोगांपासून मुक्त करता येते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT