खनिज कमतरतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये होणारे आजार

दुधाळ जनावरांना खनिज मिश्रणांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
दुधाळ जनावरांना खनिज मिश्रणांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
Published on
Updated on

खनिजाचा अभाव असलेल्या मातीत जर पिके घेतली तर पिकांमध्येसुद्धा या खनिजाचा अभाव आढळून येतो. परिणामी या खनिजाचा अभाव असलेला चारा जनावरांच्या खाण्यात येऊन जनावरांमध्येसुद्धा फॉस्फरसची कमतरता निर्माण होते आणि जनावरे फॉस्फरसअभावी होणाऱ्या लालमूत्र रोगाला बळी पडतात. जनावरांच्या निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते. पौष्टिक आहार हा सर्व पोषण मूल्ये मिळून बनतो. यामध्ये कर्बोदके, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, मेद व पाणी इ. घटकांचा समावेश होतो. ही सर्व पोषण मूल्ये जर जनावरांच्या खाद्यात नियमितपणे राहिली तर जनावरेही निरोगी राहतात. जनावरे कोणत्याही प्रकारच्या रोगाला, कमतरतेला बळी पडत नाहीत. यापैकी एकाही घटकाची जर जनावरांमध्ये कमतरता निर्माण झाली तर जनावरे रोगाला बळी पडतात. यापैकी खनिजांच्या कमतरतेमुळे लाल मूत्र हा रोग होतो. हा रोग फॉस्फरस खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. मराठवाड्यातील मातीमध्ये मुख्यत: फॉस्फरस या खनिजाचा अभाव आहे. मातीमध्ये या खनिजाचा अभाव असल्यामुळे अश्या मातीत जर पिके घेतली तर पिकांमध्येसुद्धा या खनिजाचा अभाव आढळून येतो. परिणामी या खनिजाचा अभाव असलेला चारा जनावरांच्या खाण्यात येऊन जनावरांमध्येसुद्धा फॉस्फरसची कमतरता निर्माण होते. जनावरे फॉस्फरसअभावी होणाऱ्या लालमूत्र रोगाला बळी पडतात. लालमूत्र रोग

  • हा मादी जनावरांना होणारा रोग असून दुधाळ व गाभण जनावरांमध्ये आढळून येतो. परंतु या रोगाचे प्रमाण साधारणत: जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये जास्त आहे.
  • गायी-म्हशीच्या तुलनेमध्ये म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • हा रोग ७-१० वर्षांच्या प्रौढ गायी-म्हशींना होतो.
  • गाभण जनावरांमध्ये या रोगाचे प्रमाण ७६ टक्के तर दुधाळ जनावरांमध्ये (१-३ महिने) प्रमाण २४ टक्के आहे.
  • या रोगाची लक्षणे जनावर विल्यानंतर २-४ आठवड्यांमध्ये दिसून येतात.
  • रोगाची लागण वर्षभरात कधीही होऊ शकते; परंतु उन्हाळ्यामध्ये रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात दिसून येतो.
  • रोगाची कारणे 2) फॉस्फरस खनिजांची कमतरता.

  • नैसर्गिकरीत्या मातीमध्ये खनिजाची कमतरता.
  • सातत्याने पिकाचे उत्पादन.
  • अतिवृष्टी.
  • मातीमध्ये जास्त प्रमाणात असणारे अल्युमिनिअम, लोह, कॅल्शियम यांचे प्रमाण.
  • खनिज कमतरता असलेल्या मातीमध्ये पिकाचे उत्पादन घेतल्यामुळे.
  • जनावरांना फक्त वाळलेला चारा दिल्यामुळे, कारण वाळलेल्या चाऱ्यामध्ये फॉस्फरस या खनिजाचा अभाव असतो.
  • - दुष्काळग्रस्त भागातील जमीन व मातीची वारंवार होणारी धूप यामुळे मातीमध्ये फॉस्फरस कमतरता निर्माण होते.
  • आतड्यामध्ये फॉस्फरस खनिजाची शोषण क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे
  • २) जीवनसत्त्व ‘डी’ ची कमतरता

  • ज्या जनावरांना फक्त वाळलेला चारा दिला जातो, तसेच ज्याठिकाणी हिरव्या चाऱ्या‍चा जास्त अभाव आहे, शिवाय ज्या जनावरांच्या खाद्यात खुराकाचे प्रमाण ही खूप कमी आहे. अशा जनावरांमध्ये या रोगाचा प्रसार अति तिव्रतेने होतो.
  • कॅल्शियम ः फॉस्फरस (२:१) हे गुणोत्तर व्यवस्थित नसणे.
  • हगवणीसारख्या आजाराची लागण.
  • ओटीपोटामध्ये बिघाड.
  • ३) शरीराची फॉस्फरस खनिजाची गरज वाढल्यामुळे दुधामधून प्रती लिटर ०.९३ - १ ग्रॅम फॉस्फरस जाते. गाभण जनावरामध्ये वासराच्या वाढीसाठी फॉस्फरसची सर्वात जास्त गरज असते. जनावर विल्यानंतर त्याला लगेचच खनिजविरहीत वाळलेला चारा दिल्यामुळे. रोगाची लक्षणे

  • चारा कमी प्रमाणात खाणे किंवा पूर्ण चारा खाणे बंद करणे.
  • मंदावणे, सुस्त राहणे, अशक्तपन्ना जाणवणे.
  • दूध कमी होणे.
  • हृदयाचे ठोके वाढणे.
  • रोगाची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात श्वसनाची गती वाढणे.
  • रवंथ करण्याची क्रिया मंदावते.
  • कॉफीच्या रंगाची लघवी होते.
  • जनावरे कण्हुन चिकट व घट्ट शेण टाकतात.
  • शेवटच्या टप्प्यात कावीळ होते.
  • काही वेळा गर्भपातदेखील होतो.
  • अशक्तपणामुळे जनावर नेहमी बसूनच राहते. परिणामी जनावर मृत्युमुखी पडते.
  • रोगाचे निदान

  • जनावरांना कोणत्या प्रकारचा चारा किती प्रमाणात दिला गेला आहे.
  • जनावर किती महिन्यांचे गाभण आहे, जनावर कधी व्याले आहे.
  • दुष्काळामध्ये कोणत्या प्रकारचा चारा देण्यात आला आहे.
  • कॉफीच्या रंगाची लघवी, डोळ्याच्या कडा पांढऱ्या‍या होणे, कण्हुन शेण टाकणे.
  • प्रयोग शाळेमध्ये रक्त व लघवी तपासणी करून घेणे.
  • उपचार पद्धती

  • रोगाचे निदान झाल्यावर सलग चार दिवस उपचार केल्यानंतर लवकर फरक दिसून येतो.
  • उपचारामध्ये सलाईन, जीवनसत्त्व बी, फॉस्फरसची इंजेक्शन, रक्तवाढीच्या गोळ्यांचा समावेश असावा.
  • प्रतिबंधात्मक उपाय

  • दुभत्या व गाभण जनावरांना रोज ५० ग्रॅम मीठ द्यावे.
  • जनावरांना संतुलित संपूर्ण पौष्टिक असा आहार द्यावा.
  • वातावरणातील बदलापासून जनावरांचे संरक्षण करणे.
  • जनावरांच्या खाद्यामध्ये खुरकाचा समावेश करावा.
  • खनिज मिश्रण हे मुख्यता वापरले गेले पाहिजे. त्यानुसार फॉस्फरसचे प्रमाण हे खालीलप्रमाणे :
  • संपर्क ः डॉ. कल्पना केदार, ७२१८५७४८९७ डॉ. मंजूषा ढगे, ९०६७०३७२०३ (पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर, जि. लातूर)  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com