काळजी पशुधनाची

जनावरांमध्ये पोटॅशियमची कमतरता केव्हा निर्माण होते?

Team Agrowon

पोटॅशियम कमतरतेची कारणे-

· आजारी जनावरांनी अधिक काळ चारा न खाल्ल्यास अशा जनावरांमध्ये पोटॅशियमची कमतरता (potassium deficiency) जाणवते.

· काही आजारांमध्ये जनावरांच्या तोंडाला इजा झालेली असल्यास किंवा त्यांना वातावरणाचा किंवा इतर कोणताही ताण आलेला असेल तर जनावर चारा खात नाही परिणामी त्या जनावराला पोटॅशियमची कमतरता जाणवते.

· जनावरांमधील पचन संस्थेशी संबंधित आजार किंवा किडनीशी संबंधित आजारांमध्ये देखील जनावरांच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता होते.

· गायीमध्ये अॅक्युट मस्टाटीसमध्ये देखील पोटॅशियमची कमतरता दिसून येते.

· अधिक दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायीमध्ये विल्यानंतर पोटॅशियमची कमतरता दिसून येते.

पोटॅशियम कमतरतेची लक्षणे

· जनावराच्या मांसपेशी कमजोर होऊन जातात.

· जनावराच्या मांस पेशी चा थरकाप होऊ लागतो.

· गायीची अवघड प्रसूती करत असताना वासरू ओढून काढलेले असल्यास वासरू ओढल्यानंतर गायीच्या मांड्यांचा थरकाप होतो परिणामी गाय खाली बसते, उभी राहत नाही अशा वेळी तिला पोटॅशियमची कमतरता झालेली असते.

· विल्यानंतर गायीची वार बाहेर पडत नाही. अशा वेळेस वार पडण्याचे औषध देऊन देखील वार पडत नाही हा अनुभव अनेक पशुवैद्यकांनी घेतलेला आहे.

· जनावराच्या मानेच्या मांस पेशी कमजोर होतात त्यामुळे जनावर मान धरत नाही, मागच्या पायाच्या मांस पेशी कमजोर झाल्याने जनावर उभे राहत नाही.

उपचार

· पोटॅशियम शिरेमधून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देऊ शकतो परंतु असे करणे धोकादायक असते त्यामुळे शक्यतो पोटॅशियम हे तोंडावाटे पाजावे.

· जनावरांना पोटॅशियमची खूप जास्त कमतरता असेल तरच पशुवैद्यका शिरेतून पोटॅशियम देतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

Agriculture Plowing : नांगरटीची वेळ, खोली अन् फायदे

Water Storage : चिंताजनक! देशातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा, राज्याचीही स्थिती बिकट

Nutrients Use : अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर

SCROLL FOR NEXT