Devani Cow Agrowon
काळजी पशुधनाची

Desi Cow : देशी देवणी गोवंश संवर्धनासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

Cow Conservation : पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. तसेच देशी देवणी गोवंश संवर्धन व जतन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी (ता.११) मराठवाडा विभागातील पशुसंवर्धन व प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाचा आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त प्रवीणकुमार देवरे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, खासगी सचिव मंदार वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त गणेश देशपांडे, राजकुमार पडीले, डॉ. प्रशांत चौधरी तसेच मराठवाडा विभागातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्यातील विभागाची वाटचाल, विभागाची ध्येय धोरणे, विभागातील पशुधन, २१ वी पशुगणना, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, दुभत्या जनावरांसाठी खाद्य सुधारणा कार्यक्रम, वैरण विकास कार्यक्रम, पशुरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत लसीकरण, जिल्हा निहाय पशुधन नोंदणी, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र, स्मार्ट योजना, दुग्ध विकास प्रकल्प, पुशपालनासाठी शेतकऱ्यांना सुलभ वित्त पुरवठा, दूध संकलनाचे जाळे तयार करणे, चारा निर्मितीत स्वंयपूर्ण होणे आदींसह विभागाचा आढावा घेतला.

मंत्री मुंडे म्हणाल्या, की पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.तालुका पातळीवरील पशुवैद्यकीय दवाखाने तसेच पदभरती याबाबतही प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

SCROLL FOR NEXT