गाय, म्हैस विल्यानंतर (calving) म्हणजे प्रसुतीनंतर गर्भाशय मुख काही काळ उघडे राहते. विल्यानंतर काही कारणांमुळे गायी-म्हशींच्या योनी मार्गातून गर्भाशय (uterus) बाहेर आल्याचे दिसून येते. यालाच आपण मयांग बाहेर येणं (prolapse of uterus) किंवा भांडे बाहेर पडणे असंही म्हणतो. यामध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव (bleeding) होतो. यामुळे जनावरांच्या जीवितास देखील धोका निर्माण होऊ शकतो. पण योग्य वेळी पशुवैद्यकाकडून (veterinary doctor) उपचार करून घेतल्यास ही समस्या नियंत्रणात येऊ शकते. योग्य उपचार झाल्यास जनावराच्या पुढील प्रजननक्षम आयुष्यावरील विपरीत परिणामही कमी करता येऊ शकतात.
गर्भाशय / मायांग बाहेर येण्याची कारणे :
- गाय, म्हैस विताना अडचण निर्माण झाल्यास योनी मार्गामध्ये जखमा होऊन अति प्रमाणात वेदना झाल्यास गर्भाशय बाहेर येते.
- गायी-म्हशीच्या गर्भाशयातून वासरू बाहेर काढताना अधिक प्रमाणात बळ लावल्यास.
- अप्रशिक्षित अथवा अर्धप्रशिक्षित लोकांकडून वासरू बाहेर काढण्याचा प्रयत्न.
- गाभण काळाच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाची सर्वाधिक वाढ होत असते. या काळात योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजयुक्त संतुलित आहार न मिळाल्यास.
- रक्तामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअमची कमतरता निर्माण झाल्यास गर्भाशयाची हालचाल मंदावते.
- व्यायल्यानंतर ६ ते ८ तासांमध्ये वार न पडल्यास आणि अति प्रमाणात कळा दिल्यास हा धोका संभवतो.
प्रतिबंधात्मक उपाय –
- गर्भधारणेच्या काळात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आहार व व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावेत. त्यानुसार दररोजचा आहार पुरवणे गरजेचे आहे.
- गाय, म्हैस प्रसूतीवेळी अडथळा आल्यास पशुवैद्यकाची मदत घ्यावी.
- गाय, म्हशीला प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर योग्य प्रमाणात व्यायाम असणे गरजेचे आहे.
- जनावरे विल्यानंतर त्यांना कोरडा आणि हिरवा चारा योग्य प्रमाणात द्यावा.
- एकूण दूध उत्पादनाच्या प्रमाणात संतुलित आहाराचा पुरवठा करावा.
- जनावरांच्या गोठ्याची बांधणी, जनावरे बसण्याच्या जागेचा उतार योग्य प्रमाणात असावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.