Veterinary College  Agrowon
काळजी पशुधनाची

Veterinary Registration : खासगी पशुसेवकांना नोंदणी करणे बंधनकारक

Department Of Animal Husbandry : जिल्हात प्रजननक्षम पशुंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा व अन्य सुविधा पुरविणाऱ्या सर्व खासगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आदेश पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्तांनी दिले आहेत.

Team Agrowon

Nanded News : जिल्हात प्रजननक्षम पशुंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा व अन्य सुविधा पुरविणाऱ्या सर्व खासगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आदेश पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व खासगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात प्रजननक्षम पशुंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम रेतन करणारे खासगी पशुसेवक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरविणाऱ्या तंत्रज्ञ, गोठीत रेतमात्रा वितरक व रेत बँकांनी पशुसंवर्धन उपायुक्त किंवा गोजातीय प्राधिकरण यांच्याकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आदेश काढण्यात आले आहे.

कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यक परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी, भारत सरकारच्या मैत्री भारतातील बहुउपयोगी कृत्रिम रेतनचे प्रशिक्षण घेतलेले असावे.

तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण, आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव आहे किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पशुसखी अशा पात्र खासगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना पाच वर्षांकरिता एक हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात किंवा सहायक आयुक्त जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नांदेड येथे भरून नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. अन्यथा या कायद्याचे कलम चार व पाच अन्वये दंड आकारणी होऊ शकते.
- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Road Development: महामार्गाच्या थांबलेल्या कामास प्रारंभ

Rural Entrepreneurship: गाव तेथे उद्योजक संकल्पना राबवविणार

Agriculture Assistant Officers: ‘सहायक कृषी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये जागा मिळावी’

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

SCROLL FOR NEXT