Buffaloes
Buffaloes Agrowon
काळजी पशुधनाची

स्फुरदाच्या अभावी म्हशीमधील आजार

डॉ.प्रफुल्लकुमार पाटील, डॉ.सौ.मत्स्यगंधा पाटील

स्फुरदाच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने म्हशीमध्ये लालमूत्र रोग आढळतो. ही समस्या दरवर्षी डिसेंबर ते जुलैच्या दरम्यान मोठया प्रमाणात आढळून येते.जनावरांना केवळ वाळलेला चारा जास्त प्रमाणात देवू नये. त्याऐवजी हिरवा चारा, वाळलेला चारा व योग्य प्रमाणात खुराक जनावरांच्या आहारात द्यावा.

कमी पर्जन्यमान (Low rainfall) असणाऱ्या भागात हिरवा चारा (Green fodder) केवळ पावसाळा व हिवाळ्याच्या सुरवातीला उपलब्ध असतो. त्यानंतर हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे पशुपालक जनावरांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात किंवा केवळ कडबा, सोयाबीन गुळी/ भुसकट, उसाचे वाळलेले वाडे (Kadaba, soybean sorghum / husk, dried sugarcane husks) इत्यादीचा वाळलेल्या चारा म्हणून वापर करतात. अशा चाऱ्यांमध्ये पोषणतत्वांचा अभाव असतोच परंतु उपलब्ध पोषणतत्वांची जनावराच्या शरीरातील उपलब्धता कमी असते.
क्षारांचा विचार केल्यास वाळलेल्या चाऱ्यांमध्ये स्फुरदाची कमतरता आढळून येते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने म्हशीमध्ये लालमूत्र रोग (Red urine disease in buffaloes) आढळतो. ही समस्या दरवर्षी डिसेंबर ते जुलैच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आढळून येते. लालमूत्र रोगाची समस्या जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये गाभण (Pregnancy in animals) काळाच्या शेवटच्या २ ते ३ महिन्यात व गाय,म्हैस व्याल्यानंतर पहिल्या २ ते ४ आठवड्यात दिसून येते.

लालमूत्र रोग उद्भवण्याची कारणे :
१) जनावरांच्या आहारात (diet of animals) हिरव्या चाऱ्याचा अभाव म्हशींच्या आहारात केवळ वाळलेल्या चाऱ्याचा जास्त वापर. वाळलेल्या चाऱ्यामध्ये स्फुरदाची कमतरता असते. चाऱ्यातील स्फुरदाचे प्रमाण हे विशेषत: जमिनीतील स्फुरदाच्या प्रमाणावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील जमिनीमध्ये स्फुरदाचे प्रमाण कमी असल्याचे ‍निदर्शनास आले आहे. वाळलेल्या चाऱ्याच्या तुलनेत हिरव्या चाऱ्यामध्ये स्फुरदाचे प्रमाण २ ते ३ पट जास्त आहे. चाऱ्यापेक्षा खुराकामध्ये स्फुरदाचे प्रमाण चारपट अधिक असते. म्हणजेच आहारातील वेगवेगळ्या घटकांत स्फुरदाचे प्रमाण वेगवेगळे / कमी-जास्त आहे.
२) जनावरांच्या आहारात कॅल्शिअम व स्फुरद (Calcium and Phosphorus in the diet) या खनिजाचे प्रमाण २:१ नसेल तर जनावरांच्या शरीरात स्फुरदाचे योग्य‍ प्रकारे शोषण होत नाही. त्यामुळे स्फुरदाची कमतरता जाणवते. लालमूत्र समस्या असणाऱ्या भागात चाऱ्यांमध्ये कॅल्शिअम व स्फुरदाचे प्रमाण २:१ नसल्याचे आढळून आले आहे.
३) जास्त दुधाळ म्हशीमध्ये जास्त दूध उत्पादनासाठी आणि गाभणकाळातील शेवटच्या टप्प्यात गर्भाशयातील वासराच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज वाढते. ही गरज केवळ वाळलेल्या चाऱ्यातून पूर्ण होत नाही. परिणामी लालमूत्र रोगाची समस्या उदभवते.

लक्षणे : (Symptoms)
१) मुख्य लक्षण म्हणजे फिकट किंवा गडद, काळसर किंवा कॉफीच्या रंगाची लघवी (Coffee colored urine) होते.
२) चारा खाण्याचे प्रमाण हे लालमूत्र रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
३) शरीर तापमान सर्वसाधारण तापमानाच्या जवळपासच राहते.
४) जनावर अशक्त व मलूल बनते. शेण टाकताना जनावर कुथते. डोळ्याचा श्लेमल पडदा गुलाबी ऐवजी पांढरट होत जातो.


बबेसियोसीस आणि लालमूत्र आजारातील फरक. (Differences between Babesiosis and Red Urine Disease.)
१) बबेसियोसीस या आजारामध्ये लालमूत्राबरोबर शरीर तापमान वाढते (१०४-१०६ अंश फॅरानाईट). या जनावरात गोचिड प्रादुर्भाव कमी जास्त दिसून येतो. या आजारात लालमूत्राची तीव्रता व हिमोग्लोबीन घटण्याचे प्रमाण जास्त असते.
२) स्फुरदाच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या लालमूत्ररोगामध्ये शक्यतो शरीर तापमान सर्वसाधारण तापमानाइतकेच असते. गोचिड प्रादुर्भावाची शक्यता कमी असते. अशा जनावरांच्या आहारात जास्त
प्रमाणात व जास्त काळ केवळ वाळलेल्या चाऱ्याच्या वापराचा पूर्वेतिहास असतो.

उपचार: (Treatment:)
- या आजारात शक्य तेवढ्या लवकर उपचार तज्ञ पशुवैद्यकाकडून करून घ्यावेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना:-
१) मोठ्या जनावरांत शरीर पोषणासाठी सर्वसाधारणपणे १३ ते १५ ग्रॅम आणि प्रतिलिटर दूध उत्पादनासाठी १.५ ते २ ग्रॅम जास्तीचे स्फुरद द्यावे लागते. तसेच गाभण काळात २० ते २६ ग्रॅम जनावरास मिळावे.
२) जनावरांना केवळ वाळलेला चारा (Dried fodder) जास्त प्रमाणात देवू नये. त्याऐवजी हिरवा चारा, वाळलेला चारा व योग्य प्रमाणात खुराक जनावरांच्या आहारात द्यावा.
३) जनावरांच्या आहारात शारीरिक अवस्थेनुसार क्षार मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर करावा.
४) जनावरांना वाळलेल्या चाऱ्यासोबत ज्वारी/ मका भरड, शेंगदाणा/ सरकी पेंड, तूर/ हरभरा चुनी आणि तांदळाचा/ गव्हाचा कोंडा (Sorghum / Maize coarse, Peanut / Vinegar flour, Tur / gram lime and rice / wheat bran) यांचे योग्य प्रमाण असलेला खुराक द्यावा. यामुळे स्फुरदाची कमतरता टाळली जाईल.
५) जनावरांना केवळ कॅल्शियमयुक्त घटकांचा जास्त प्रमाणात पुरवठा करू नये.
६) कॅल्शिअम आणि स्फुरदाच्या शोषणासाठी जनावरांना ‘ड’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.
७) जनावरांच्या शारीरिक अवस्थेनुसार आहारात योग्य तो बदल करावा.

संपर्क डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT