Animal Care dudh vyavsay mahiti Agrowon
काळजी पशुधनाची

Phase Feeding Technique : दूध उत्पादनातील सातत्यासाठी ‘फेज फिडींग' तंत्र

Animal Care : गाई,म्हशींच्या दूध उत्पादनात सातत्य राहाण्यासाठी वाढीच्या टप्यानुसार आहार व्यवस्थापन करावे. यासाठी व्यवस्थापनाचे महत्त्वाचे टप्पे माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्यानुसार आहार आणि व्यवस्थापनात बदल आवश्यक असतात.

Team Agrowon

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
Milk Production : गाई,म्हशींच्या दूध उत्पादनात सातत्य राहाण्यासाठी वाढीच्या टप्यानुसार आहार व्यवस्थापन करावे. यासाठी व्यवस्थापनाचे महत्त्वाचे टप्पे माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्यानुसार आहार आणि व्यवस्थापनात बदल आवश्यक असतात.

गाय, म्हैस व्यायल्यानंतर एका वेतात जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळवण्यासाठी आहार नियोजनाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. एका वेतात जास्तीच्या दूध उत्पादनासाठी दूध देण्याच्या काळाची विभागणी करून त्यावेळेच्या शारीरिक गरजेनुसार पोषणतत्वांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. याकरिता गाई, म्हशींच्या दूध देण्याचा काळ आणि गाभणकाळ याची एकूण सहा टप्प्यामध्ये विभागणी करावी.

पहिला टप्पा:
१) हा टप्पा मुख्यत: गाय, म्हैस आटवल्यानंतर ते विण्यापुर्वीचे२१ दिवस या दरम्यानचा असतो. याला भाकड काळ म्हणतात. अशा गाई,म्हशींना वेगळे करून त्यांचे योग्य आहार व्यवस्थापन केल्यास येणाऱ्या वेतात २५० ते ६५० लिटरपर्यंत जास्तीचे दूध उत्पादन मिळू शकते.

२) या काळात कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशी आकुंचित होतात. गर्भाशयातील आकार वाढत असतो, शारीरिक वजन वाढत असते.

३) चयापचयाचे आजार टाळण्यासाठी शारीरिक अवस्था दर ३ ते ३.५ पर्यंत ठेवणे गरजेचे असते. या काळात शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण हे वजनाच्या १.८ ते २.५ पर्यंत असते. या काळात पशुखाद्य देण्याचे प्रमाण हे १ ते ३ किलोपर्यंत असते. यामधून आवश्यक प्रमाणात क्षार आणि जीवनसत्त्व यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे.

४) या काळात जर गाय, म्हैस जास्त अशक्त असेल तर अतिरिक्त पशुखाद्याची गरज असते. या काळात जनावरांत ७ ते ११ किलो पर्यंत मुरघास दिल्यास अतिरिक्त ऊर्जेचा पुरवठा केला जातो, चाऱ्याची सकसता वाढते.

आहार नियोजन ः
१) आहारात १२ ते १३ टक्के प्रथिनांचे प्रमाण असावे.
२) ६० ते ८० ग्रॅम कॅल्शिअम (जास्त दूध देणारे जनावर) द्यावे.
३) ३० ते ४० ग्रॅम फॉस्फरस (जास्त दूध देणारे जनावर) द्यावे.
४) मिठाचे प्रमाण ३० ग्रॅमपर्यंत मर्यादित ठेवावे.
५) सूक्ष्म क्षार आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा.
६) एकूण आहारातील शुष्क पदार्थाच्या प्रमाणाच्या एक तृतीयांश भाग मुरघासाचा पुरवठा करावा.

दुसरा टप्पा ः
हा टप्पा जनावर विण्यापूर्वी २१ दिवसांपासून ते विण्याच्या दिवसापर्यंत असतो. या काळातील आहार नियोजन हे पुढील बाबीसाठी महत्त्वाचे असते.

१) जनावर व्यायल्यानंतर पुरवठा होणाऱ्या अतिरिक्त ऊर्जेला जनावरांचे कोठीपोट जुळवून घेण्यासाठी रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण टिकवावे.

२) रोगप्रतिकारशक्ती वाढवावी, टिकवून ठेवावी.

३) किटणबाधा तसेच यकृतातील स्निग्ध पदार्थ साठा टाळण्यासाठी, पॉझिटिव्ह ऊर्जेचे संतुलन टिकवण्यासाठी नियोजन करावे.

आहार नियोजन ः
१) शुष्क पदार्थांच्या प्रमाणाच्या २.५ ते ३.६ किलोपर्यंत पशुखाद्याचे प्रमाण ठेवावे.
२) या काळातील पशुखाद्यातील प्रथिनांचे प्रमाण १५ ते १६ टक्यांपर्यंत ठेवावे. यामध्ये संरक्षित प्रथिनांचा पुरवठा असावा.

३) स्निग्ध पदार्थांचा पुरवठा ११० ग्रॅम ते १५० ग्रॅम या प्रमाणात नियंत्रित ठेवावा.

४) आहारात लांब धाटाचा चाऱ्याचा समावेश करावा.

५) आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.

६) आहारात ॲनायोनिक सॉल्टचा वापर करावा.

७) यीस्ट कल्चर दररोज १० ते १२० ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

८) नियासीन दररोज ६ ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

९) सुप्त कितनबाधा होत असेल तर प्रोपायलिन ग्लायकॉल २५० ग्रॅम विण्यापूर्वी ३ ते ७ दिवस द्यावे.

तिसरा टप्पा ः
हा टप्पा गाय, म्हैस व्याल्यानंतर २ ते ३ आठवड्यांनी सुरू होतो.या काळात पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

१) खाद्य, चारा खाण्याचे प्रमाण याची वेळोवेळी तपासणी करावी.
२) दररोज शरीर तापमानाची नोंद ठेवावी.
३) कोटीपोटाच्या हालचालींची नोंद ठेवावी.
४) गर्भाशयातून येणाऱ्या स्त्रावाचे निरिक्षण करावे.
५) किटोन बॉडीजसाठी तपासणी करावी.

आहार नियोजन ः
१) कोटीपोटाचे कार्य चांगल्या प्रकारांसाठी चालण्यासाठी उच्च प्रतिचा लांब धाट असलेला चारा १.३० ते २.६० किलोपर्यंत द्यावा.

२) पशुखाद्यामध्ये संरक्षित प्रथिने आणि पचनीय तंतुमय पदार्थांचा वापर करावा. सोयाबीन कोंडा किंवा सायटर्स पल्पचा वापर करावा.

३) आहारातील पोषणतत्वांचे प्रमाण/ घनता वाढवावी. यामुळे कमी चाऱ्यातून जास्त पोषणतत्वांचा पुरवठा होतो.

४) यीस्ट कल्चरचा पुरवठा करावा. यामुळे तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढण्यास मदत होते.बफर्सचा वापर करावा.

५) १२ ग्रॅम नियासीनचा पुरवठा करावा, यामुळे कितनबाधा टाळता येते.

६) प्रोपायलिन ग्लायकॉल किंवा कॅल्शिअम प्रोपीओनेटचा वापर करावा.

चौथा टप्पा ः

हा टप्पा व्याल्यानंतर १४ ते १०० दिवसांचा असतो. या काळात दूध उत्पादन उच्चपातळीवर असते. आहार कमी असतो, वजन कमी होत असते. स्निग्ध पदार्थांचा जास्तीचा वापर टाळावा.
आहार नियोजन ः

१) उच्च प्रतिच्या चाऱ्याचा आहारात वापर करावा.
२) लायसीन, मिथिओनिनची गरज पूर्ण करण्यासाठी आहारात संरक्षित प्रथिनांचा पुरवठा करावा.
३) आहारात पशुखाद्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे.
४) स्निग्ध पदार्थाचा पुरवठा नियंत्रित ठेवून संरक्षित स्निग्ध पदार्थांचा वापर करावा.
५) चारा खाण्यासाठी जास्तीची जागा द्यावी.

पाचवा टप्पा ः
हा काळ दूध उत्पादनाचा मध्यभाग असतो. या काळात दूध उत्पादनात घट होत असते. हा टप्पा व्यायल्यानंतर १०० दिवस ते २०० दिवसांचा असतो. या काळात जनावरे चारा चांगल्या पद्धतीने खात असतात. त्याचबरोबर शरीर वजनात वाढ होत असते.

आहार नियोजन ः
१) शुष्क पदार्थाचे सेवन वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.
२) स्निग्ध पदार्थांचा आहारात वापर करावा.
३) फीड ॲडिटिव्हचा आहारात वापर करावा.

सहावा टप्पा ः
हा टप्पा गाय व्याल्यानंतर २०० दिवसांनी ते गाय आटवण्यापर्यंत असतो. या काळात जनावर गाभण असते, वजनवाढ होत असते. दूध उत्पादनात प्रत्येक महिन्याला ६ ते ९ टक्यांनी घटते. पहिलारू कालवडींच्या शरीराची वाढ होत असते, त्यामुळे या काळात वजन वाढ आणि शरीर वाढ होते.

आहार व्यवस्थापन ः
- या काळात आहारात चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
- संरक्षित प्रथिनांचा पुरवठा कमी करावा.
- स्निग्ध पदार्थांचा पुरवठा कमी करावा.
- फीड ॲडिटिव्हचा वापर करण्याची गरज नसते.
- शरीर अवस्था दर ३.२५ ते ३.७५ राहील याची काळजी घ्यावी.
- खाद्यावरील प्रति गाय खर्च कमी करावा.
--------------------------------------------------
संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
( पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif MSP Increase: कापूस हमीभावात ५५७ रुपये, सोयाबीनमध्ये ३८० रुपये तर तुरीत ४५० रुपये वाढ

Agriculture Input Linking: निविष्ठा विक्रेत्यांनी लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई : पालकमंत्री जयकुमार गोरे

Water Scarcity: पाण्यासाठी नागरिकांचा जीव कासावीस

Agriculture Solar Pump Schemes: सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ घ्या : संतोष कुमार सारंगी

Bubli Lake Desilting: बुबळी तलावातील गाळ काढणे सुरू

SCROLL FOR NEXT