Summer Water Crisis: पालघर जिल्ह्यात राष्ट्रहिताचे प्रकल्प होत असताना ग्रामीण भागातील पाणीटंचाईची साडेसाती आजही कायम आहे. केंद्र, राज्य सरकारकडून प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या घोषणा होत असताना आदिवासीबहुल असलेल्या वाडा, मोखाडा, जव्हार तालुक्यातील २४ गावे, ७९ टंचाईग्रस्त पाड्यांना आठवड्याला तब्बल ८६ लाख ६४ हजार लिटर पाणी टँकरने देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. .धरणांचा जिल्हा असा नावलौकिक असला तरी ‘उशाला धरण आणि घशाला कोरड’ अशी परिस्थिती पालघर जिल्ह्यातीस ग्रामीण भागातील नागरिकांची झाली आहे. अनेक भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने विहिरी, कुपनलिकास पारंपरिक जलस्रोत आटले आहेत. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मोखाडा, जव्हार सारख्या तालुक्यांमध्ये महिलांना पाण्यासाठी दोनदोन तास वणवण करावी लागते..Dharashiv Water Scarcity: धाराशिव जिल्ह्यातील तेरा प्रकल्पांतील पाणीसाठा राखीव.तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावेवाडा - ओगदा, ठुणावे, तुसे, आखाडा-वडवली, कुयलू, तोरणे, चेंदवली, घोणसई, जामघर, लखमापूर, पिंपळास, मुसारणी, मोज, कादिवली गावांमधील पाड्यांवर पाणीटंचाई आहे.मोखाडा - आसे, पाथर्डी, सायदे, काष्टी, धामणी, पळसुंडा, घानवळ, धामणशेत, गोमघर, नाशेरा, बोटोशी, हिरवे, पोशेरा, सातुर्ली, पळसुंडा, चास गावांना बारा हजार लिटरच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे..Water Scarcity: माहूरचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार.जव्हार- वावर, वांगणी, जुनी जव्हार, रायतळे, कासटवाडी, जांभूळ माथा, सारसून, हिरडपाडा, आपटाळे, धिवंडा,कोगदा, न्याहाळे खुर्द, आपटाळे, रामपूर,बोपदरी, कुतुर विहीर, किरमिरा, दाभोळून, काशीवली क्रमांक एक, कोल्लाळे, पाथर्डी, गडाची मेट, धानोशी,जयेश्वर, राजेवाडी गावांना टँकरदने पाणीपुरवठा लागत आहे..जनजीवन विस्कळीत‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कोट्यवधींच्या पाणी योजनांची कामे झाली आहेत. पण प्रत्यक्षात नळांना पाणी नसल्याची तक्रार केली जात आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा करत असले तरी अनेक दुर्गम पाड्यांवर टँकर वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही गावांमध्ये आठवड्यातून एकदाच टँकर येत असल्याने जन जीवन विस्कळित झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.