Animal care Agrowon
काळजी पशुधनाची

MAFSU : हायडॅटिडोसिस रोगाचे निदान करणाऱ्या संशोधनाला पेटंट

गोवंशामध्ये आढळणाऱ्या हायडॅटिडोसिस या परजीवी रोगाचे निदान करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या एलायझा किटला पेटंट मिळाले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः गोवंशामध्ये (Cow) आढळणाऱ्या हायडॅटिडोसिस (Hydatidosis) या परजीवी रोगाचे निदान करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्य एलायझा किटला (ELISA Kit) पेटंट मिळाले आहे. भारतीय पेटंट कार्यालय, बौद्धिक संपदा कायदे, भारत सरकार यांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला ते प्रदान केले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या (Mumbai Veterinary College) तज्ज्ञांनी या संदर्भातील संशोधन तडीस नेले आहे.

एलायझा किटविषयक संशोधन करणारे तज्ज्ञ डॉ. विलास वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील गोवंशामध्ये हायडॅटिडोसिस रोगाचे प्रमाण तीन टक्‍के आहे. जिवंत प्राण्यांमध्ये या रोगाची लक्षणे दिसून येत नाही.

परिणामी, या रोगाचे निदान मृत जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतरच होते. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांमध्ये दूध देण्याची क्षमता व वजन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. वेळेवर उपचार न केल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता राहते. यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते.

या प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने या रोगाचे निदान करण्यासाठी जलद व प्रभावी हायडॅटिडोसिस किट विकसित केली आहे.

या माध्यमातून हायडॅटिडोसिस रोगाचे खात्रीशीर निदान करणे शक्‍य होते. निदान झाल्यानंतर गोवंशावर उपचार करणे शक्‍य होत असल्याने गोवंशाचा जीवही वाचण्यास मदत होते.

हायडॅटिडोसिस रोगनिदानाकरिता विकसित करण्यात आलेल्या एलायझा किटचा उपयोग भारतातील सर्व चिकित्सालय व दवाखान्यात करता येणार आहे.

त्याकरिता या किटचे उत्पादन आणि उपयोगिता वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. हे संशोधन पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आले.

या संशोधन कार्यात डॉ. विलास वैद्य, विभाग प्रमुख डॉ. रवींद्र झेंडे, कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक संचालक डॉ. अशोक कुमार, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. चारुशिला राऊत यांचे योगदान राहिले आहे.

हायडॅटिडोसिस या रोगाचे निदान करण्याकरिता अद्यापपर्यंत कोणतीच सुविधा गावस्तरावर नव्हती. या किटचा वापर करून आवश्‍यक ते रक्‍त नमुने घेत पशुवैद्यकीय चिकित्सालय, दवाखान्यापर्यंत पाठवीत त्याचे पृथक्करण करणे शक्‍य होणार आहे. आतापर्यंत भारतच नाही, तर जागतिकस्तरावर देखील गोवंशाकरिता अशाप्रकारची किट उपलब्ध नव्हते. भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फतही याची पडताळणी करण्यात आली. त्याआधारेच याला पेटंट मिळाले आहे.

- डॉ. विलास वैद्य, सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ

मो. ९९६७२८०५७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT