Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin: लंपी स्कीन रोगावर नवी लस विकसित

लंपी स्कीन रोगाच्या नियंत्रणासाठी हिसार येथील राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्राने ‘लंपी- प्रोव्हॅकइण्ड’ ही लस विकसित केली आहे.

Team Agrowon

राजस्थान आणि गुजरातमध्ये दुभत्या जनावरांना लंपी स्कीन (Lumpy Skin Disease) रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. त्यामुळे तिथले पशुपालक हैराण झाले आहेत. या रोगामुळे राजस्थान आणि गुजरातमधील दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत राजस्थानमध्ये २१११ तर गुजरातमध्ये १६७९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

भारतात पहिल्यांदा लंपी हा रोग ऑगस्ट २०१९ साली ओदिशा राज्यात अढळला. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यात या रोगाचा प्रसार झाला. महाराष्ट्रात हा रोग गडचिरोली जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेथील साथरोगाचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय रोगनिदान प्रयोगशाळेत झाले होते. रोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्री पॉक्स प्रवर्गातील असून ते मुख्यतः गायी, म्हशींमध्ये आढळतात. या रोगावर लस उपलब्ध नसल्यामुळे शेळ्यांमध्ये देवी रोगावर वापरण्यात येणारी लस टोचून हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते.


आता लंपी स्कीन रोगाच्या नियंत्रणासाठी हिसार येथील राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्राने ‘लंपी- प्रोव्हॅकइण्ड’ ही लस विकसित केली आहे. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या (इज्जतनगर) सहयोगाने ही लस विकसित केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात या लसीच्या वितरणास नुकताच प्रारंभ करण्यात आला.

इतर राज्यातही लंपीचा प्रादुर्भाव

देशाभरातील सहा राज्यात या रोगामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यात आतापर्यंत राजस्थानमध्ये २१११, गुजरात १६७९, पंजाब ६७२, हिमाचल प्रदेश ३८, अंदमान आणि निकोबार २९, तर उत्तराखंडमध्ये २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

तीन वर्षांपासून प्रयत्न
२०१९ मध्ये ओडिशामध्ये लंपी स्कीन रोगाची प्रथम नोंद झाल्यापासून शास्त्रज्ञ ही लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत होते. आता ही लस उपलब्ध झाली असून ३० कोटी जनावराचे लसीकरण करणे शक्य होईल याप्रमाणे या लसींच्या व्यापारीकरणासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. आयसीएआरच्या या दोन संस्था दरमहा अडीच लाख डोस तयार करू शकतात, अशी माहिती उपमहासंचालक बी. एन. त्रिपाठी यांनी दिली. लसीच्या डोसची किंमत १-२ रुपये असणार आहे. या लसीमुळे जनावराची प्रतिकारशक्ती कमीत कमी एक वर्ष टिकते. त्यामुळे या रोगाचे दरवर्षी लसीकरण करावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget for Farmer 2026 : शेतकऱ्यांसाठी 'भारत-विस्तार एआय टूल', अर्थमंत्र्यांची घोषणा; नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा

Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर

Cultural Economy: निसर्गप्रधान जीवनशैली व सांस्कृतिक-अर्थकारण

National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Grass lands: गवताळ राने जपणे गरजेचे

SCROLL FOR NEXT