Goat Market  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Market : अखेर मुरूडचा शेळीमेंढी बाजार पूर्ववत

Livestock Market : राज्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड येथे ७० वर्षांपासून जनावरांचा बाजार भरतो. शेळ्यामेंढ्यांची आवक वाढल्यामुळे बाजाराचे दोन दिवसांत विभाजन करत सोमवारी जनावरांचा तर मंगळवारी शेळ्यामेंढ्यांचा बाजार सुरू केला.

Team Agrowon

Latur News : सोलापूर शहर बक्कर कसाब असोसिएशनने मंगळवारपासून (ता. १८) विजापूर हायवेवरील नंदुरगाव (ता. उत्तर सोलापूर) शिवारात शेळ्यामेंढ्यांचा खासगी आठवडी बाजार सुरू केल्यामुळे मुरूड (ता. लातूर) येथे पन्नास वर्षापासून सुरू असलेल्या शेळीमेंढी बाजाराला फटका बसला आहे.

बाजार अर्ध्यावर येत बाजारपेठेतील व्यवहारावरही परिणाम झाला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व बाजारातील प्रमुख व्यापारी तसेच खरेदीदारांनी आठवड्यापासून बाजार पूर्ववत करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नाला यश आले असून, आठवड्यातच मंगळवारी (ता. २५) मुरूडचा शेळीमेंढी बाजार पूर्ववत झाला. यानिमित्ताने ग्रामपंचायतीने व्यापारी व खरेदीदारांसोबत बैठक घेऊन पुन्हा असा प्रकार होणार नाही, यासाठी उपाययोजना हाती घेतल्या.

राज्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड येथे ७० वर्षांपासून जनावरांचा बाजार भरतो. शेळ्यामेंढ्यांची आवक वाढल्यामुळे बाजाराचे दोन दिवसांत विभाजन करत सोमवारी जनावरांचा तर मंगळवारी शेळ्यामेंढ्यांचा बाजार सुरू केला. बाजारात येणारे व्यापारी, खरेदीदार व शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा व सुरक्षितता मिळत गेल्याने बाजाराची भरभराट झाली. काही तासांत सात कोटींहून अधिक उलाढाल होते. तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक व अन्य राज्यासह महाराष्ट्रातून व्यापारी व खरेदीदार बाजारात येतात.

मागील काही दिवसांत बाजारात चुकीच्या प्रवृत्तीचा शिरकाव झाला. विविध कारणांसाठी व्यापाऱ्यांकडून वर्गणी मागण्याचे प्रकार घडू लागले. गावच्या सीमेवर पोलिस व आरटीओंचाही मोठा त्रास वाढला. बाजारात सुविधाही कमी पडू लागल्या. गाव पुढाऱ्यांचेही या समस्या दूर करण्यासाठी पाठबळ मिळेना.

यामुळेच काही व्यापाऱ्यांनी एकत्र येत बाजाराची स्वतंत्र चूल मांडण्याचा घाट घातला. यातूनच सोलापूर शहर बक्कर कसाब असोसिएशनने गाजावाजा करत १८ फेब्रुवारीपासून स्वतंत्र खासगी शेळीमेंढीबाजार सुरू केला. या बाजाराची जाहिरातबाजी सुरू असताना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी काहीच प्रयत्न केले नाही.

पर्यायी बाजाराचा विषय गांभीर्याने घेतला नाही. यामुळे १८ फेब्रुवारीला सोलापूरचा पहिला खासगी बाजार फुलला व मुरूडच्या बाजारात शेळ्यामेंढ्यांची ७० टक्के कमी आवक झाली. खासगी बाजारासाठी कर्नाटकातून व कर्नाटकमार्गे येणाऱ्या खरेदीदारांना सक्ती झाली. काही ठिकाणी अडवून त्यांना खासगी बाजारात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती झाली.

या प्रकारानंतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी बाजार पूर्ववत करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. व्यापाऱ्यांची वाहने अडवणाऱ्यांना पायबंद घातला. रात्रीच्या वेळी जाऊन व्यापाऱ्यांची वाहने मुरूडच्या बाजारात आणली. पोलिसांची मदत घेतली. सोलापूरच्या लोकप्रतिनिधींचेही साह्य घेतले. बाजारातील जुने खरेदीदार व व्यापाऱ्यांसह बाजाराचा ठेका घेतलेल्यांनाही सर्वतोपरी प्रयत्न केले. याचा परिणाम मंगळवारी बाजार पूर्ववत झाला.

खरेदीदार व व्यापाऱ्यांशी संवाद

बाजार पूर्ववत झाल्यानंतर ग्रामपंचायतीने बाजारातील प्रमुख खरेदीदार व व्यापाऱ्यांशी संवाद केला. यानिमित्ताने झालेल्या बैठकीत व्यापारी व खरेदीदारांची होणारी अडवणूक व त्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना हमी दिली.

यासोबत बाजार दुसरीकडे जाण्याचे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचेही नियोजन करण्यात आले. सोलापूरच्या खासगी बाजारामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर सर्व क्षेत्रांतून टीका झाली होती. आठवड्यातच बाजार पूर्ववत केल्याने पदाधिकाऱ्यांचे व्यापारी, खरेदीदार व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT