Mahseer Fish Conservation  Agrowon
काळजी पशुधनाची

गोड्या पाण्यातील वाघ मासा

महाशीर हा मासा अंगावरील मोठ्या खवल्यामुळे ‘खवल्या मासा‘ म्हणून सुद्धा ओळखला जातो. याचे ओठ जाड असून त्यावर चार मिशा असतात.

Team Agrowon

महाशीर (mahasheer) हा मासा (fish) अंगावरील मोठ्या खवल्यामुळे ‘खवल्या मासा‘ म्हणून सुद्धा ओळखला जातो. याचे ओठ जाड असून त्यावर चार मिशा असतात. या माशांच्या निरनिराळ्या जातीत ओठांची ठेवण वेगवेगळी असते. पृष्ठपर सर्वसाधारणपणे शरीराच्या मध्यभागी येतो. आणि अगदी त्याच्या खाली कटीपर असतो. पृष्ठपराच्या सुरुवातीला एक मजबूत काटा असतो. शेपटीचा पर दुभागलेला असतो.

हा मासा वाहत्या पाण्यात व मोठ्या जलाशयात आढळून येतो. या माशाची वाढ १.२ मीटरपासून २.७ मीटरपर्यंत आढळून येते.

महाशीर माशाला गोड्या पाण्यातला वाघ असे म्हटले जाते. हा मासा दिसतोही साधारण पट्टे असलेल्या वाघासारखा. कारण महाशीर माशामुळे जलीय परिसंस्थामधील 'सर्कल ऑफ लाईफ' पूर्ण होत असते. महाशीर मासा नदी संवर्धनाचे कामही करतो. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या माशाचे संवर्धन करण्यासाठी टाटा पॉवरने ५० वर्षांपूर्वी पुढाकार घेऊन संवर्धनाचे कार्य सुरु केले. सध्या माशाची ही जात आययुसीएनच्या नामशेष होणाऱ्या प्राजातींच्या लाल यादीतून बाहेर आली आहे.

पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, पाण्याच्या तापमानातील बदल याचा या माशांवर विपरीत परीणाम होत नाही. असे असले तरी हा मासा प्रदूषण असलेल्या पाण्यात राहू शकत नाही. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, जेव्हा आपण नदी-जलाशयामध्ये कचरा टाकतो तेव्हा महाशीर माशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा रब्बीला फटका

Winter Weather Update: तापमानात चढ-उतार कायम

Ajit Pawar In Politics : साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे उपमुख्यमंत्री; अजित पवारांची राजकीय कारकीर्द

Ajit Pawar Last Rites: 'दादा परत या...' अजितदादांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

Tribal Health: आदिवासी वस्त्यांत जनजागृती

SCROLL FOR NEXT