शाकाहारी मासा तुम्ही खाल्लाय का?
मत्स्यशेती (fish farming) करताना माशांच्या अनेक जातींचे संगोपन करून उत्पादन घेतले जाते. ग्रास कार्प (Grass carp) ही विदेशातील माशाची एक जात आहे. ज्याला गवत्या मासा असेही म्हणतात. जागतिक स्तरावर ५ मेट्रिक टन इतक्या प्रमाणात ग्रास कार्पचे उत्पादन घेतले जाते. हा मासा फक्त गवत, शेवाळ खाऊन स्वतःचे पालन पोषण करीत असतो. या माशाची वाढ जलद गतीने होते. कारण या माशाचे खाद्य खाण्याचे प्रमाण जास्त असते. हा मासा स्वतःच्या वजनाच्या तीनपट जास्त खाद्य (feed) खातो. या माशाची लांबी ६० सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. जास्तीत वजन ४० किलोपर्यंत जाऊ शकते.
गवत्या मासा शरीराने लांबट असतो. हा मासा दिसायला काहीसा मृगळ माशासारखा असतो. याचे तोंड निमुळते आणि अरुंद असते. या माशाला मिशा नसतात. शेपटीचा पर दुभंगलेला असतो. या माशाला खाद्य जास्त लागते. हा मासा पाण्यातील पान वनस्पती आणि गवत खातो, म्हणून याला गवत्या मासा असे म्हणतात. या माशाचे वास्तव्य पाण्याच्या मधल्या भागात असते. या भागातील गवत आणि पान वनस्पती तो खात असतो.
हा मासा वर्षात १००० ते १५०० ग्रॅमपर्यंत वाढत असतो. त्यामुळे हा मिश्र शेतीसाठी उपयुक्त आहे. हा मासा दुसऱ्या वर्षात प्रजननासाठी योग्य होतो. ७ ते ८ महिन्यात या माशाचे वजन अर्धा ते एक किलोपर्यंत मिळते. एका हेक्टरवर ८ टन माशाचे उत्पादन मिळू शकते.
ग्रास कार्प माशाचे संवर्धन करताना ते मोनोकल्चरमध्ये कधीही करू नये. नेहमी कंपोझीट किंवा पॉलीकल्चर मध्ये करावे. यामुळे पाण्यातील जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते. तसेच पाण्याच्या जैवविविधतेचा माशांच्या योग्य वाढीसाठी उपयोग करून घेता येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

