Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccine : ‘लम्पी स्कीन’वरील लस फक्त नऊ तालुक्यांतच

Lumpy Skin Disease ; यंदा फक्त नऊ तालुक्यांतच या समस्येच्या प्रतिबंधात्मक लशी देण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन वर्षे लंपी स्कीन हा त्वचाआजार पशुधनाला बेजार करीत आहे. शेतकऱ्यांची मोठी वित्तीय हानी करीत आहे. परंतु त्यासंबंधी प्रतिबंधात्मक कार्यवाहीत प्रशासन, शासन अपयशी ठरत आहे. यंदा फक्त नऊ तालुक्यांतच या समस्येच्या प्रतिबंधात्मक लशी देण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात १५ पैकी फक्त भुसावळ, बोदवड, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर व यावल या तालुक्यांत मिळून सुमारे तीन लाख लशींचा पुरवठा झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभाग करीत आहे. या लशींची मागणी अनेक महिन्यांपासून सुरू होती. परंतु मागील महिन्यात या लशी प्राप्त झाल्या.

मध्यंतरी अल्प साठा खानदेशात किंवा जळगावात प्राप्त झाला होता. त्याचा साठा पुरेसा असल्याचा दावा आहे, परंतु अद्याप अनेक तालुक्यांत या लशी पोहोचलेल्या नाहीत. त्यात जळगाव, अमळनेर, धरणगाव, भडगाव, चाळीसगाव या भागात पुरेसा साठा आवश्यक आहे. लशींचे वितरण तालुकास्तरावर झाले, पण प्रत्यक्षात लसीकरणाचा आकडा प्रशासनाकडे नाही.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये लम्पी स्कीनच्या समस्येने तोंड वर काढले होते. पशुधनाची मोठी हानी खानदेशात झाली होती. सातपुडा पर्वत व इतर भागात शेकडो पशुधनाचा मृत्यू झाला, पण त्याची नेमकी आकडेवारी प्रशासनाकडे नव्हती. प्रशासन उपाययोजना करण्यात अपुरे पडले. यात खासगी पशुवैद्यकांनी मोठी कमाई उपचारांच्या व्यवसायातून केली होती.

यात शेतकऱ्यांची लूटही झाली. हा कटू अनुभव असतानादेखील लम्पीसंबंधीचे लसीकरण वेगात झालेले नाही. तसेच त्याचा पुरेसा साठा झालेला नाही. जळगाव जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाखांवर आहे. खानदेशात ही संख्या १७ लाखांपर्यंत आहे. परंतु लशी जळगावात फक्त तीन लाख आहेत. धुळे, नंदुरबारातही लशी पुरेशा नाहीत. प्राप्त लशींद्वारे शेतकऱ्यांच्या जनावारांचे लसीकरण करण्यासंबंधी फारसे गांभीर्य यंत्रणांना नाही.

ऐन वेळी पळापळ नको...

मागील वर्षी लम्पी स्कीनचा उद्रेक ऑगस्टमध्ये झाला होता. परंतु अपेक्षित लसीकरण मागील वेळेस झाले नाही. यंदाही अशीच स्थिती आहे. प्रादुर्भावानंतर यंत्रणा पळापळ करतात. परंतु रोगराईपूर्वीच प्रतिबंधात्मक कार्यवाही करा, शेतकऱ्यांना दिलासादायक काम करा, असा मुद्दा यंदा दूध उत्पादक व इतर शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT