बुलडाणा ः जिल्ह्यात जनावरांवर लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव झालेला असून, आतापर्यंत सुमारे ४३४ जनावरांचा मृत्यू (Animal Death Due To Lumpy Skin) झाला. सध्याही अगणित जनावरे या आजाराने ग्रस्त असून लसीकरणाची (Lumpy Skin Vaccination) उपाययोजना जोमाने राबवली जात आहे. प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालक मात्र, चिंतातूर झालेले आहेत.
जिल्ह्यात लम्पी स्कीनचा शिरकाव झाल्यानंतर सुमारे साडेअकरा हजारांहून अधिक जनावरांना याची बाधा झालेली आहे. उपचारानंतर ८ हजार ४०० जनावरे रोगमुक्त झाली. पशुसंवर्धन विभागामार्फत तीन लाख ९७ हजार जनावरांना लसीसुद्धा दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यात दूग्ध व्यवसाय केला जातो.
लम्पी आल्यापासून दुग्ध उत्पादनाला फटका बसला. लम्पी स्कीनमुळे आतापर्यंत ४३४ जनावरे दगावली आहेत. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक ९० जनावरांचा मृत्यू झाला. याशिवाय मलकापूर ८९, शेगाव आणि खामगाव तालुक्यातील प्रत्येकी ५३, संग्रामपूर तालुक्यात ५१, मोताळा ३६, चिखली २१, नांदुरा २०, बुलडाणा, देऊळगावराजा तालुक्यात प्रत्त्येकी सात, सिंदखेडराजा दोन आणि लोणार तालुक्यातील एका जनावराचा लम्पी स्कीन आजाराने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ११ हजार ७७० जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यापैकी आठ हजार ४८७ जनावरे सुधारली आहेत. जिल्ह्यातील २३८ गावांत प्रादुर्भाव दिसून आला. या गावांमधील ११ हजार ७७० जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे होती. अद्यापही २८०० पेक्षा अधिक बाधित जनावरांवर उपचार केले जात आहेत. ३ लाख ९७ हजार ४८५ जनावरांना लस देण्यात आली आहे. सध्याही या आजाराचा प्रादुर्भाव कायम आहे.
इतर उपाययोजनांवरही जोर
पशुपालक लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना पशुवैद्यकीय उपचार देत आहेत. त्यासोबतच खासगी उपचारही करीत आहेत. घरगुती, आयुर्वेदिक उपाययोजना केल्या जात आहेत. काही जनावरांना लसीकरण केल्यानंतरही बऱ्याच विलंबाने दिलासा मिळत आहे. तर उशिराने उपचार मिळालेली जनावरे लम्पी स्कीनमुळे दगावल्याची वस्तुस्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.