Lumpy Skin
Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin: लम्पी स्किनची साथ नियंत्रणात- पशुसंवर्धन आयुक्त

टीम ॲग्रोवन

‘‘राज्यात दुधाळ जनावरांमध्ये लम्पी स्किन आजाराचा (Lumpy Skin Outbreak) फैलाव वाढत आहे. परंतु राज्यातील सुमारे सव्वा कोटी गोवंशापैकी केवळ ५ हजार ५१ पशुधन म्हणजेच केवळ ०.०३६ टक्के बाधित (Lumpy Skin Infection) आहे. यामधील केवळ ८९ पशुधन मृत (Livestock Died) झाले आहे. लम्पीसाठीचे लसीकरण (Lumpy Vaccination) आणि औषधोपचार मोफत आहेत. लम्पीची साथ (Lumpy Epidemic Disease) पूर्णतः नियंत्रणात असून, पशुपालकांनी घाबरून न जाता, वेळीच पशुधनावर उपचार करून घ्यावेत,'' असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह (Sacchindra Pratap Singh) यांनी केले आहे.

लम्पी स्किन आजार राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. या आजाराने ५ हजार ५१ पशुधन बाधित झाले आहे. तर २ हजार ८० पशुधन उपचारांती बरे झालेले आहेत. उर्वरित पशुधानावर उपचार सुरु असून ८९ पशुधन मृत झाले, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तांनी दिली.

लम्पी स्किन आजारवर गोट पॉक्स प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ही लस अत्यंत प्रभावी असून सद्यस्थितीत राज्यात एकूण २३ लाख ८३ हजार लसमात्रा उपलब्ध आहेत. पुढील दोन दिवसांत अजून ५० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सध्या संसर्ग क्षेत्राच्या ५ किमी परिघातील पशुधनास प्रथम प्राधान्याने लसीकरण मोहिम सुरू आहे. १५ सप्टेंबर अखेर ९ लाख ८० हजार २४३ पशुधनाचे लसीकरण झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

लम्पी स्किन आजार डास, माश्या व गोचीड या किटकांपासून पसरत असल्यामुळे किटक नियत्रंण केल्यास प्रादुर्भाव प्रभावीपणे रोखता येणे शक्य आहे. पशुपालकांना गोठ्यांची स्वच्छता करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रांमपचायतीमार्फत पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत, असे पशुसंवर्धन आयुक्तांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

SCROLL FOR NEXT