Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Monsoon Rain Update : सिंधुदुर्गात यावर्षी जून-जुलैमध्ये मुसळधार पाऊस बरसला मात्र तरीही सरासरीपेक्षा कमीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
Heavy Rainfall
Heavy Rainfall Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्गात यावर्षी जून-जुलैमध्ये मुसळधार पाऊस बरसला मात्र तरीही सरासरीपेक्षा कमीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात ३ ऑगस्टपर्यंत १६७३.६ मिमी पावसाची नोंद झाली असून ८३.२ टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद कणकवली तालुक्यात (२०३२.४ मिमी) झाली आहे.

जिल्ह्यात या वर्षी ८ मे पासूनच मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. १६ मे ते २४ मे या कालावधीत मुसळधार पाऊस झाला. २५ मे रोजी जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर दोन-तीन दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक वर्षांनंतर मे मध्येच नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. मे अखेरीपर्यंत जिल्ह्यात ६२९ मिमी पावसाची नोंद झाली होती.

Heavy Rainfall
July Rainfall : जुलै महिन्यात पावसाने ओलांडली सरासरी

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या मध्यापासून पावसाचा जोर वाढला. जून अखेरीपर्यंत चांगला पाऊस झाला. परंतु तरीही जूनमध्ये पाऊस सरासरी गाठू शकला नाही. जूनमध्ये ६७३.५ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीच्या ७६.५ टक्के पाऊस झाला. जुलैचा पहिला आठवडा कोरडाच गेला.

Heavy Rainfall
Rainfall Shortage Maharashtra : राज्यातील सव्वादोनशे तालुक्यांत कमी पाऊस

पावसाअभावी भातरोप लागवडीची कामेदेखील रखडली. परंतु १० जुलैनंतर पावसाचा जोर वाढला. त्यानंतर २४ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जुलैमध्ये ९७५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या ९३.५ टक्के पाऊस झाला. जून आणि जुलैमध्ये एकूण २०३२.४ मिमी इतका पाऊस झाला असून सरासरीच्या ८२.२ टक्के पाऊस झाला.

कोष्टक

तालुका सरासरी पाऊस पडलेला पाऊस

देवगड १६३४.१ १४५६.२

मालवण १६३८.५ १५६५.७

सावंतवाडी २५४९.३ १८९२.७

वेंगुर्ला १९५६.१ १४५६.२

कणकवली २१७५.४ २०३२.४

कुडाळ २०५०.२ १५६३.८

वैभववाडी २२१५.६ १९९२.१

दोडामार्ग २२११.५ १३८०.९

एकूण २०१२.६ १६७३.६

३१ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा १५ ते २० टक्के कमी पावसाचा अंदाज आहे. भातपीक फुटवे फुटण्याच्या नाजूक स्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतांमध्ये पाण्याचा समतोल राखणे आवश्यक आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव या कालावधीत वाढतो. त्यामुळे पिकांचे निरीक्षण करून कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com