Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा पशुधनात वाढता धोका

Lumpy Vaccination : खानदेशात सातपुडा पर्वत भागात पशुसेवा शासनस्तरावरून पोचत नाही. या भागात सर्वेक्षण, लसीकरण अशी कुठलीही कार्यवाही सुरू नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे. पशुधन बेजार होत असून, जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात म्हणजेच धरणगाव, एरंडोल, अमळनेर भागात ही समस्या दिसत आहे. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सुस्त आहे.

अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांना पशुवैद्यक नाहीत. अन्य जागाही रिक्त आहेत. काही पशुवैद्यकीय दवाखान्यांतील कर्मचाऱ्यांवर अन्य दवाखान्यांचाही प्रभार जागा रिक्त असल्याने आहे. धुळे, जळगाव व नंदुरबारात ही समस्या दिसत आहे. सर्वेक्षण, पाहणी ही कामे ठप्प आहेत.

अनेक दुधाळ पशुपालकांनी लम्पी स्कीन आजाराच्या भीतीने आपल्या गोवर्गीय पशुधनावर प्रतिबंधात्मक उपचार करून घेतले आहेत. त्यासाठी खासगी पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली असून, मोठा खर्चही लसीकरण व अन्य औषधांसाठी आला आहे. लम्पी स्कीनची समस्या अन्यत्र पसरू लागली असून, शेतकरी खरिपात कमी पावसाच्या संकटानंतर आता लम्पी स्कीन आजाराच्या चिंतेत आहेत.

अनेक दवाखान्यांत अपुरे मनुष्यबळ

खानदेशात सातपुडा पर्वत भागात पशुसेवा शासनस्तरावरून पोचत नाही. या भागात सर्वेक्षण, लसीकरण अशी कुठलीही कार्यवाही सुरू नाही. तसेच अन्य भागातही पशुवैद्यकीय सेवा अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ढेपाळली आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद पशुवैद्यकीय केंद्राचा प्रभार कानळदा येथील पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांवर आहे.

या दोन्ही केंद्रांतील अंतर पाच किलोमीटरपेक्षा अधिक आहे. एका पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत चार ते पाच गावे आहेत. एवढ्या गावांत दोन कर्मचारी पोचू शकत नाहीत. ही यंत्रणा जिल्हा परिषदेची आहे.

त्यात अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांत औषधसाठा नसतो. सध्या तापमान व आर्द्रता अशी समस्या आहे. पशुधनात हगवणीसह ताप, अशक्तपणा अशा समस्याही आहेत. यामुळे शेतकरी घरगुती उपाय करून डास, माशांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT