Lumpy Skin Disease: ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावाची पशुसंवर्धनकडून अखेर कबुली

Maharashtra Livestock Update: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लम्पी स्कीन आजाराने शेकडो पशुधन बाधित आणि बेजार झाल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी सुरू होत्या. मात्र याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे एकही नोंद नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. याबाबत ‘लम्पी स्कीन डोके वर काढतोय.
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लम्पी स्कीन आजाराने शेकडो पशुधन बाधित आणि बेजार झाल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी सुरू होत्या. मात्र याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे एकही नोंद नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. याबाबत ‘लम्पी स्कीन डोके वर काढतोय,

मात्र पशुसंवर्धनकडे एकही नोंद नाही’ या शीर्षकाखाली रविवारी (ता. १३) प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर पशुंसवर्धन विभागाने लम्पी स्कीनची बाधा झाल्याचे मान्य करत, सर्व जिल्ह्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. तर बाधित पशुधनाच्या गावांत तातडीने लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Animal Husbandry Department
Lumpy Skin Disease: पुण्यात 'लम्पी'चा विळखा; सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांना उपाययोजनांची पत्राद्वारे विनंती

याबाबतची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली. ते म्हणाले, ‘लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावाच्या घटनांची माहिती घेण्यात आली. याबाबत सर्व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची बुधवारी (ता. १६) बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

या वेळी सर्व जिल्ह्यांना बाधित पशुधनाला तातडीने उपचार आणि त्यांच्या संपर्कातील आलेल्या पशुधनाला तातडीने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी मुबलक लसमात्रा सर्व जिल्ह्यांकडे उपलब्ध आहेत. तसेच ज्या गावांमध्ये लम्पी स्कीन बाधित पशुधन आहेत. त्या पॉकेटमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.’

Animal Husbandry Department
Lumpy Skin Disease: लम्पी त्वचा आजारावर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जरी होत असला, तरी मागील लसीकरणामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढली असल्याने पशुधन उपचारांना प्रतिसाद देत आहेत. या हंगामात अद्याप एकही पशुधन मृत झालेले नाही. तसेच लसीकरणाच्या मोहिमेचे रिशेड्युलिंग करण्याच्या सूचना गावपातळीवरील पशुचिकित्सालये आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लम्पी स्कीनचे संकट गडद होत आहे. २९८ पशुधनांमध्ये प्रादुर्भाव झाला असून, ८८ बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत, तर दोन दगावली असल्याचे समोर आले आहे. तसेच जिल्ह्यातील ७२ हजार ६०० गायवर्गीय पशुधनांपैकी ६९ हजार ३१७ पशुधनाला लसीकरण करण्यात आले आहे. मालवण सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ल्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अधिक आहे. काही गावांना आपण भेटी दिल्या आहेत. पशुपालकांनी घाबरून न जाता पशुधनाला लसीकरण करून घ्यावे. लम्पी स्कीनची लक्षणे दिसताच पशू दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com