Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : ‘लम्पी’चा विळखा वाढतोय

Lumpy Outbreak Khandesh : खानदेशात यंदा लम्पी स्कीन आजाराने गोवर्गीय पशुधनास बेजार केले आहे. सुमारे ५० पेक्षा अधिक गावांत हा आजार पसरला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा लम्पी स्कीन आजाराने गोवर्गीय पशुधनास बेजार केले आहे. सुमारे ५० पेक्षा अधिक गावांत हा आजार पसरला आहे. त्याचा विळखा घट्ट होत असतानाच शासकीय पशुवैद्यक सेवा अपुरी पडत असल्याने पशुपालकांना पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

लम्पी स्कीन आजार डास, गोचीड व माश्‍यांमुळे पसरतो, त्यामुळे पशुधनाची काळजी घ्या, असे आवाहन पशुवैद्यकीय विभाग करीत आहे. परंतु पूर्वीच किंवा उन्हाळ्याच्या कालावधीत शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाने कोणतेही लसीकरण, जनजागृती मोहीम राबविली नाही. आता आजार आल्यानंतर लसीकरण केले जात आहे.

अलीकडेच जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पारोळा, एरंडोल भागात जाऊन लम्पीग्रस्त पशुधनाची पाहणी केली. पशुपालकांसमवेत संवाद साधून, दूध उकळून प्या, काळजी घ्या, असे आवाहन केले. तसेच लसीकरणाबाबत आढावा घेऊन गतीने कार्यवाही, सर्वेक्षण व उपचार करण्याच्या सूचना केल्या.

लम्पी स्कीन आजार जळगाव जिल्ह्यात मागील सात ते आठ दिवसांत सतत वाढला आहे. आजाराचा अटकाव झालेला नाही. सहा पशुधन त्यामुळे मृत्युमुखी पडल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात २३ गावांत आणि धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे २८ गावांत लम्पी स्कीन आजाराचा फैलाव झाला आहे.

हा फैलाव झाल्यानंतर जिल्हा परिषद व शासनाची पशुवैद्यकीय यंत्रणा जागी झाली. यात अनेक दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य पदे रिक्त आहेत. यामुळे शासकीय पशुवैद्यकीय सेवा अपुरी पडत आहे.

उपचारांसाठी मोठा खर्च

पशुधन आजाराने बेजार होत असल्याने अनेक पशुपालक आपल्या बैल, गायींवर खासगी पशुवैद्यकांच्या मदतीने उपचार करून घेत आहेत. त्यासाठी मोठा खर्चही येत आहे. अनेक पशुवैद्यक यात अनावश्यक औषधे माथी मारून पशुपालकांची लूटही करीत आहेत.

सातपुडा पर्वत भागात गोवर्गीय पशुधन अधिक आहे. या भागात पशुवैद्यकीय सेवा पोचत नाही. यामुळे या भागात हा आजार वाढल्यास अधिकची समस्या, पशुधनाची हानी होईल, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. शासकीय पशुवैद्यकांना या भागात पाठवून सर्वेक्षण, लसीकरण करून घेण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT