Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नांदेड जिल्ह्यातील चौदा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

lumpy Outbreak : नांदेड जिल्ह्यात गोवंशाना लम्पीस्कीन आजाराची पुन्हा एकदा लागण झाली आहे. यामुळे पशुपालकांना चिंता लागली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील गोवंशाना लम्पीस्कीन आजाराची लागण झाली आहे. सोळा तालुक्यांपैकी आठ तालुक्यामधील १४ गावांमध्ये या रोगाचा जनावरांमध्ये प्रादुर्भाव आढळून आला. या गावातील एकूण ४८ जनावरांना लागण झाल्याची नोंद आहे. त्यापैकी १२ जनावरे दुरुस्त झाली आहेत. तर सध्या ३६ जनावरे बाधित आहेत.

या रोगाचा प्रादुर्भाव पसरू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी स्कीन आजार प्रतिबंधक गोटपॉक्स लस टोचण्याचे काम चालू असल्याची माहिती सहायक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात गोवंशाना लम्पीस्कीन आजाराची पुन्हा एकदा लागण झाली आहे. यामुळे पशुपालकांना चिंता लागली आहे.

यापूर्वी जिल्ह्यात याच रोगामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता. हा रोग प्रामुख्याने गाय वर्गामध्ये आढळून येतो. त्यात लहान वासरांना या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. नांदेड जिल्ह्यात गायवर्ग जनावरे तीन ७५ हजार ३५ आहेत. नांदेड जिल्ह्यासाठी आजपर्यंत तीन लाख ४४ हजार पाचशे लम्पी स्कीन आजार प्रतिबंधक गोटपॉक्स लस प्राप्त झाली आहे.

त्यापैकी तीन लाख १७ हजार ७६५ लस मात्रा टोचून पूर्ण झाली आहे. अन्य जनावरांना लसीकरण करणे चालू आहे. तसेच सर्व पशुवैद्यकीय अधिकारी या आजाराच्या बाबतीत गंभीर आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात आजाराच्या प्रतिबंधाबाबत शेतकऱ्यांना जनजागृती करणे लसीकरण करणे आणि आजार यापुढे वाढू नये यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.

लम्पी स्कीन आजाराची लक्षणे

गायवर्ग जनावरांना भरपूर ताप येणे, अंगावर गाठी येणे, गळ्याखालची पोळी आणि शक्यतो पुढच्या पायांना सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. जनावरांच्या सर्वांगावर गाठी आल्यामुळे ते जनावर अस्वस्थ होते आणि चारा खात नाही. हा आजार विषाणूजन्य आजार असल्याने हा आजार आल्यानंतर त्यावर ठोस असा उपाय नाही.

त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण हाच सगळ्यात चांगला पर्याय असू शकतो. हा आजार आल्यास जनावरांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कडुनिंबाचा पाला, रुचकीचा पाला, पपईचा पाला किंवा सीताफळाची पाला भरपूर प्रमाणात खाऊ घालावा.

हा आजार बाह्य परोपजीवी कीटकांपासून पसरत असल्यामुळे गोठ्यात आणि परिसरात बाह्य परोपजीवी कीटक प्रतिबंधक फवारा मारून माशा, डास यांना प्रतिबंध करावा. अंगावर आलेल्या गाठी कमी होण्यासाठी एक लिटर साबणाच्या पाण्यात १० मिलि निमतेल आणि १० मिलि करंज तेल याचे द्रावण करून अंगावर फवारणी करावी. शरीरातील सर्व अवयवावर ताण पडत असल्याने लिव्हर टॉनिक द्यावे. जनावर चारा खात नसल्यामुळे त्याला स्वतः उभे राहून आदलून-बदलून चारा खाऊ घालावा, असे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

जनावरांत लम्पी स्कीन आजार आल्यास नजीकच्या पशुवैद्यकाकडे जाऊन सल्ला आणि उपचार घ्यावा. अशा जनावरांची हालचाल थांबवावी, जेणेकरून अन्य जनावरांना या रोगाची लागण होणार नाही. उपचार देखील दवाखान्यात जनावरे घेऊन न जाता जागेवरच उपचार करण्याची खबरदारी घ्यावी.
- डॉ. अरविंद गायकवाड, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT