Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराची नऊ तालुक्यांना मोठी झळ

बारा जनावरे दगावली; सव्वातीन लाख जनावरांना लसीकरण

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः जिल्ह्यातील जवळपास नऊ तालुक्यांत ‘लम्पी स्कीन’चा (Lumpy Skin) प्रादुर्भाव झाला आहे. अगदी अल्पावधीतच या आजाराने जिल्हा व्यापला आहे. पशुसंवर्धन विभागाने बाधित क्षेत्र आणि बाधित क्षेत्राबाहेरील अशा एकूण तीन लाख ३६ हजार ७८ जनावरांचे लसीकरण (Vaccination) केले आहे. पण तरीही त्यातून आतापर्यंत १२ जनावरे या आजाराने दगावली आहेत.

माळशिरस, सांगोला, पंढरपूर, करमाळा, उत्तर सोलापूर, माढा या दुग्ध व्यवसाय असणाऱ्या भागांत लम्पी स्कीनची व्याप्ती वाढली आहे. जिल्ह्यात एकूण पशुधन ७ लाख ४५ हजार ४०४ इतके आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ४२ गावांतील ३०० जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव   झाला आहे. त्यातून आतापर्यंत माळशिरसमध्ये दोन बैल, सांगोल्यात दोन गाई, पंढरपुरात एक गाय, माढ्यात एक बैल, करमाळ्यात दोन गाय, उत्तर सोलापुरात एक गाय, तीन बैल अशी चार जनावरे दगावली.

बाधित क्षेत्रातील गायवर्ग जनावरे साधारण १ लाख ७८ हजार ७३२ आहेत. त्यापैकी एकूण बाधित क्षेत्रातील एक लाख ४५ हजार ६२६ जनावरांचे (८१ टक्के) लसीकरण झाले. एकूण बाधित क्षेत्र सोडून एक लाख ९० हजार ४५२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण बरी झालेली जनावरे ८२ इतकी आहेत. तर सध्या उपचाराधीन जनावरे जवळपास २०६ आहेत. त्यात तीन जनावरे गंभीर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT