Lumpy Scene Disease : लंपी रोगामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलं

भारतात लम्पी आजाराचा दृश्‍य परिणाम एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये समोर आला. गेल्या काही दिवसांत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये आजार वेगाने पसरत आहे.
Lumpy Scene Disease
Lumpy Scene DiseaseAgrowon

कोरोमुळं आलेल्या आर्थिक संकटातून सावरू पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावलंय. गोवंशाला होणाऱ्या लंपी स्कीन रोगामुळं (Lumpy Skin) शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. हा आजार जुनाच असला तरी यंदा याची तीव्रता वाढली. या आजाराचा थेट परिणाम दुध व्यवसाय (Dairy Business) आणि जनावरांच्या बाजारावर (Livestock Market) झालाय. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्याही आवळल्या गेल्यात. पण लंपी स्किन रोग (Lumpy Skin Disease) नेमका आला कुठून? त्याचा काय परिणाम बाजारावर होतोय?

Lumpy Scene Disease
Lumpy Skin: तीन लाख जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण

भारतात लम्पी आजाराचा दृश्‍य परिणाम एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये समोर आला. गेल्या काही दिवसांत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये आजार वेगाने पसरत आहे.

या आजाराची सुरुवात आफ्रिका खंडातून झाल्याचे दिसून येते. दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये या आजाराचा सातत्याने प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र १९७० मध्ये हा आजार पश्‍चिम आफ्रिकेतील देशांमध्ये पसरू लागला. साधारणपणे २००० पासून मध्य पूर्वेतील देश आणि २०१३ पासून टर्किसह अल्बेनिया, बोस्निया, हर्जेगोव्हिना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया या देशांमध्ये लम्पी स्कीन आजाराने प्रवेश केला. अलीकडेच जॉर्जिया, रशिया, बांगलादेश आणि चीन या देशांमध्येही आजाराचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

Lumpy Scene Disease
Lumpy Skin Disease : साताऱ्यात पाच जनावरांचा मृत्यू

साधारणपणे २०२१ पासून बांगलादेश, भारत, पाकिस्तान चीन, नेपाळ, भूतान, व्हिएतनाम, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया या आशियातील देशांमध्ये या आजाराचा दरवर्षी प्रादुर्भाव वाढतोय. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये हा आजार वेगाने पसरला. येथील हजारो जनावरे आजाराने बाधित झाली आहेत. पाकिस्तान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत पाच हजार जनावरे दगावली आहेत.

जुलै महिन्यापासून देशात या आजारानं थैमान घालायला सुरुवात केली. आजपर्यंत देशभरात सुमारे ६७ हजार जनावरे या आजाराने दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. लंपी स्किन आजारामुळं दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा रोग झालेल्या गाईचं दूध खाल्ल तरी त्याचा काही परिणाम होत नाही. मात्र दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. साधारणपणे ३० ते ४० टक्के दूध उत्पादन घटलंय. दूध उत्पादनावर परिणामाबाबतची निश्चित आकडेवारी समोर आली नसली तरी बऱ्याच ठिकाणी दुभती जनावरे या आजारानं बाधित झाली आहेत.

मागील दोन वर्षे कोरोनामुळं शेतीमाल विक्रीवर निर्बंंध आले होते. बाजार समित्या बंद होत्या. शेतीमाल वहातुकीतही अडथळे होते. परिणामी शेतमाल हाती येऊनही विक्री करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना कवडीमोल दरानं माल विकावा लागला होता. सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फठका सहन करावा लागला. आता मागील काही महिन्यांपासून शेतीमाल बाजाराची गाडी रुळावर आलीये. त्यातच आता लंपी रोगानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर घाला घातलाय. लंपी रोगानं ग्रस्त जनावरे दगावत आहेत. दूध उत्पादन घटलंय. तर ही जनावर विकताही येत नाहीत. म्हणजेच या रोगामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com