Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : मिरज, पलूस तालुक्यांत ‘लम्पी स्कीन’चा शिरकाव

टीम ॲग्रोवन

सांगली ः ‘लम्पी स्कीन’ने (Lumpy Skin Outbreak) वाळव्यापाठोपाठ मिरज आणि पलूस तालुक्यांत शिरकाव केला आहे. मिरज तालुक्यात एक तर पलूस तालुक्यात चार जनावरे बाधित (Lump[y Skin Infection) झाली असून बाधित जनावरांची संख्या ३७ झाली असून यापैकी उपचारांनंतर वीस गाईंची प्रकृती बरी झाली आहे. आतापर्यंत १५ हजार जनावरांना लसीकरण (Lumpy Skin Vaccination) केले आहे.

जिल्ह्यातील वाळवा तालुक्यानंतर मिरज आणि पलूस तालुक्यांत आजाराने शिरकाव केला आहे. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत. ‘लम्पी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि उपचार दोन्ही वेळेत होणे गरजेचे असल्याने लसीकरण आणि उपचारांसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण केले जात आहे.

आतापर्यंत १५ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील गो-शाळा, पांजरपोळ अशा ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे एक लाख लसींची मागणी केली आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनाने २० हजार लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीत गोठ्यांत होणार औषध फवारणी

रत्नागिरी ः जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झालेला नाही; मात्र सतर्कता म्हणून ग्रामपंचायतीच्या मदतीने जनावरांच्या गोठ्यांमध्ये औषध फवारणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात २ लाख ७६ हजार जनावरे असून, रोगाबाबत सद़ृश लक्षणे आढळल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. डी. एस. जगदाळे यांनी दिली.

शनिवारी (ता. १०) जिल्हा परिषद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या वेळी डॉ. व्ही. व्ही. पनवेलकर, सहायक आयुक्त पशुधन चिपळूण सुधीर कानसे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुचिता शिंदे उपस्थित होते.

लम्पी स्कीन हा विषाणूजन्य त्वचा आजार असून, त्याचा प्रादुर्भाव सर्व वयाच्या पशूंना होतो. प्रामुख्याने हा आजार गायी-म्हशींमध्ये आढळतो. माश्‍या, डास, गोचीड याशिवाय बाधित जनावरांच्या त्वचेतील रक्तस्राव, लाळ यांच्या संपर्कामुळे तसेच दूषित वैरण, पाणी यामुळे होतो. शरीरावर १० ते १५ मि.मी. व्यासाचा गाठी येणे, नाकातून-डोळ्यांतून पाणी येते. भूक कमी होते, दूध उत्पादन कमी येते, पुढील पायात सूज येते, लंगडणे अशी लक्षणे दिसतात.

प्रादुर्भावग्रस्त जनावरे दोन ते तीन आठवड्यांत बरी होतात. प्रसार थांबवण्यासाठी बाधित जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावीत. गोठ्यातील गोचिडींचाऔषध फवारून बंदोबस्त करावा. कीटकनाशक औषधे फवारावीत. नजीकच्या पशुसंधर्वन दवाखान्यातून लस टोचून घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT