
नांदुरा, जि. बुलडाणा ः ‘लम्पी स्कीन’ आजाराने (Lumpy Skin Disease) सध्या पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, लसींचा पुरवठा (Lumy Skin Vaccine) मुबलक प्रमाणात करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
‘लम्पी स्कीन’वरील लस ही शासकीय पशू दवाखान्यात पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. ही लस टोचल्यानंतर २० ते ३० दिवस ही लस कार्यरत व्हायला लागते. सरकारी दवाखान्यात या लसींचा तुटवडा असून कित्येक शेतकऱ्यांचे पशुधन हे उपचाराअभावी मरणाच्या दारात उभे आहेत. नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथील शेतकरी अमोल भोलवकर यांचा बैल यामुळे मरण पावला आहे.
आणखी इतर ३ बैल बाधित आहेत. त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुबलक प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर व गावपातळीवर याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. जेणेकरून पशुधनाची जीवितहानी होणार नाही.
निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके, नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील, तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके, तालुका संपर्कप्रमुख सचिन गणगे, नांदुरा शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके, सुरेश पाटील, राहुल मोहन पाटील, रोहन मनस्कार, अमोल भोलवनकर, योगेश सुरळकर, मधुसूदन पुंडकर, अमोल ढोले, अर्जुन वानखडे, सुभाष वानखडे, भूषण श्रीखंडे, पुरुषोत्तम वनारे, सय्यद एजाज, रामेश्वर काळे, किशोर इंगळे, संतोष तायडे, पुरुषोत्तम वानखेडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.