Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सोलापुरात ‘लम्पी’ पाठ सोडेना, अद्यापही ३१९ जनावरे बाधित

Solapur Lumpy Skin News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला ‘लम्पी’चा प्रादुर्भाव अलीकडच्या काही दिवसांत आटोक्यात आला असला, तरी आजही जिल्ह्यात लम्पीबाधित ३१९ जनावरे असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला ‘लम्पी’चा प्रादुर्भाव अलीकडच्या काही दिवसांत आटोक्यात आला असला, तरी आजही जिल्ह्यात लम्पीबाधित ३१९ जनावरे असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यांपैकी २२ जनावरे अत्यवस्थ आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीच्या नियंत्रणासाठी इपिसेंटर आणि लसीकरणाच्या उपाययोजना सुरूच आहेत.

लम्पीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने गाईंमध्ये आढळतो आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास ७ लाख ४५ हजार ३२४ गायवर्गातील जनावरे आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून लम्पी जिल्ह्यातील जनावरांची पाठ काही सोडत नसल्याचे चित्र आहे. गायवर्गातील जनावरांपैकी आतापर्यंत ४२ हजार ६५० जनावरे लम्पीने बाधित झाली. पण उपचाराने त्यातून ३८ हजार ३१५ जनावरे बरी झाली. तर ४ हजार १६ जनावरे मृत पावली.

सध्या ३१९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यात २२ जनावरांची तब्येत अत्यवस्थ आहे. लम्पीबाधित सर्वाधिक गावांमध्ये माळशिरसमधील १०७ , करमाळ्यातील १०५, माढ्यातील १०४, बार्शीतील १०३, अक्कलकोटमधील ९२ आणि सांगोला तालुक्यांतील १०० गावांचा समावेश आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून सध्या रोज या तालुक्यांचा आढावा घेतला जातो आहे. तसेच बाधित जनावरांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी असलेली स्थिती सध्या नाही, असे सांगण्यात आले.

पुरेसे इपिसेंटर्स, लसीकरणही पूर्ण

लम्पीबाधित जनावरांवर उपचारासाठी जिल्ह्यात इपिसेंटर्स उभारण्यात आली असून, तालुकास्तरावरील बहुतेक सर्व पशुसंवर्धन दवाखान्यात त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील इपिसेंटरची संख्या १९८ पर्यंत पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील जवळपास ७ लाख ४० हजार ८२ जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरणही पूर्ण झाले आहे, अद्यापही हे काम सुरूच आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

लम्पीला नियंत्रणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत. जिल्हास्तरापासून गावपातळीपर्यंत आमचे सर्व सहकारी काम करत आहेत. गेल्या काही दिवसांत बाधित जनावरांचे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. एकूण पशुधनाची तुलनेत मृत पशुधनाची टक्केवारी ०.५४ आहे. यापुढेही आम्ही अधिक काळजीपूर्वक परिस्थिती हाताळून ही साथ आटोक्यात आणू.
-डॉ. डी. ए. गिड्डे, प्रभारी सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT