Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : अमरावती जिल्ह्यात पशूंसाठी ‘लॉकडाउन’

अमरावती जिल्ह्यातही पशूंवरील ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढला असून सद्यःस्थितीत १२ गावांमध्ये जनावरांमध्ये हा आजार आढळून आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पशूंसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातही पशूंवरील ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढला असून सद्यःस्थितीत १२ गावांमध्ये जनावरांमध्ये हा आजार आढळून आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पशूंसाठी लॉकडाउन (Lockdown For Animal) करण्यात आला आहे. आंतरजिल्हा पशूंची वाहतूक (Livestock Transport) बंद करण्यासोबतच प्रादुर्भाव क्षेत्रातील पाच किलोमीटरच्या परिघातील गावांसाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीन तालुक्यांत जनावरांवर लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली आहे. १४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक अशा १४ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत या आजाराने ३२० जनावरांना कवेत घेतले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अनेक जनावरांवर उपचार झाले असून ते बरे सुद्धा झाल्याचे पशुसंवर्धन उपायुक्तांनी सांगितले.

२० हजार लसींची मात्रा

शासनाकडून जिल्ह्यासाठी २० हजार लसींची मात्रा प्राप्त झाली असून येत्या आठ दिवसांत सहा हजारांवर जनावरांचे लसीकरण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अशा आहेत उपाययोजना

जिल्ह्यासाठी १० हजार लसमात्रा देण्यात आल्या आहेत. काही असल्यास १०६२ क्रमांकाच्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशासनाकडून शीघ्र कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनेक जनावरे क्वारंन्टाइन

कोरोनाच्या काळात मनुष्याला विलगीकरणात (क्वांरन्टाइन) राहण्याची वेळ आली होती, तशीच वेळ आता पशूंवर आली आहे. ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आढळून आलेल्या जनावरांचा संसर्ग अन्य जनावरांना होऊ नये यासाठी त्या जनावरांना स्वतंत्रपणे विलगीकरणात ठेवण्याची सूचना शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. शेतात जागा नसेल तर वाडीमध्ये त्यांना बांधावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT