राज्यात जळगाव,नगर अकोल्यासह जिल्ह्यातील काही भागांत सद्यःस्थितीत पशुधनामध्ये (Livestock) लम्पी (Lumpy Skin Disease News) गायवर्गीय त्वचा आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy skin Outbreak Maharashtra) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत (Department Of Animal Husbandry) जिल्हा परिषद सेस निधीतून सध्या एक लाख पाच हजार ३०० गोट पॉक्स लस (Goat Pox Vaccine) मात्रा तातडीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या गावांमधील जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, नमुने लम्पी रोगाकरिता पॉझिटिव्ह आले होते. त्यानुसार पशुसंवर्धन खात्याच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्या गावांच्या पाच किलोमीटर परिसरातील पांगरी खुर्द, मिठसागरे, फुलेनगर, मलढोण, वावी, पिंपरवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी व सायाळे येथील एकूण ७,८०० गोवर्गीय जनावरांना लम्पी रोगप्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
प्रत्येक गावात फवारणीचे औषध उपलब्ध करावे. लम्पी स्कीन हा आजार गोचीड, गोमाश्या, डास, मच्छर यांच्या चाव्याने पसरत असल्याने या आजारास प्रतिबंधन करणे तत्काळ शक्य होण्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगामधून गावात फवारणीचे औषध उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदेश दिले आहेत. लम्पी स्कीन आजार प्रतिबंधक लसीकरणासाठी पशुपालकांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
बाधित गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात येणाऱ्या गावातील तीन महिने वयोगटावरील सर्व गोवर्गीय जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण केले जाणार आहे. रोगनियंत्रणासाठी पशुपालकांनी सहकार्य करावे.- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावाची माहिती पशुपालक, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस, प्रशासनास देणे बंधनकारक आहे.
- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी-जिल्हा परिषद, नाशिक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.