Livestock exhibition  Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Exhibition : प्रदर्शनात विविध जातींच्या पशुधनाचे मोठे आकर्षण

या प्रदर्शनात पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रतिसाद देत मोठी गर्दी केली.

Team Agrowon

Animal Care नगर : जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठे राज्यस्तरीय पशुप्रदर्शन (महापशुधन एक्स्पो २०२३) (Livestock Exhibition) शिर्डीत होत आहे. या प्रदर्शनात पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रतिसाद देत मोठी गर्दी केली. मात्र काही प्रमाणात नियोजनाचा अभाव या वेळी दिसून आला. (Latest Agriculture News)

या पशुप्रदर्शनाला शुक्रवारी (ता.२४) सुरुवात झाली आहे. रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. या प्रदर्शनात महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे ९० विविध जातींच्या जनावरे, पशुपक्षांचा सहभाग आहे.

त्यात प्रामुख्याने गीरजाफर रेडा, मुऱ्हा रेडा व म्हैस, राजस्थानी गाय, म्हैस, पंढरपुरी म्हैस, खिल्लार, देवणी, लाल कंधारी, डांगी, साहिवाल, गीर, काकरेज, थारपार, राठी, साहीवाल, हरियाना गाय, वेंचूर, अमृतमल, हालीकर, कृष्णावली, ओनोल, पुगानुर, माळवी, खिलार, देवणी, लालकंधारी, गवळाऊ, डांगी, कोकणकपील, कणगी, एचएफ, जर्सी तर म्हशीत जाफराबादी, मेहसना बन्नी, निलीरावी, मुरहा भदावरी, पंढरपुरी, मराठवाडी, नागपुरी, पुर्णाथडीचा समावेश आहेत.

शेळ्यांमध्ये शिरोही, बिटल, बारबेरी, जामनापरी, कन्नीयाडू, कोरडीयाडू, तेल्लीचेरी, उस्मानाबादी, संगमनेरी, कोकणकन्याळ, आफ्रिकन बोर, सानेन, अल्फाईन, शेवाणवर्ग, मेंढ्यामध्ये मालवाडी, मालपुरा, काश्मिरी, मरीनी, गद्दी, चेंगु, मंड्या, नेल्लोर, तेलंगणा, चैन्नईटेड, रामनंदपुम व्हाईट, वेचूर, निलगिरी, मिचीबलाच, कोइमतूर यासह महाराष्ट्रातील मेंडग्याळ व विविध जातींच्या मेंढ्या सहभागी झाल्या आहेत.

त्याचे शेतकऱ्यांना मोठे आकर्षण असल्याचे दिसून आले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांत मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

शेतकऱ्यांची नाराजी

उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. तसेच कोणत्या जातीचे जनावर आहेस, त्याची वैशिष्ट्ये काय, याबाबत माहिती सांगणारे फलक नसल्याने अनेक शेतकऱ्यांना पशुधनाबाबत माहिती मिळाली नाही. काही उपस्थित शेतकऱ्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीसाठी २ हजार ४८१ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Dragon fruit Processing : ड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रिया उत्पादने

Fish Production : सुधारित मत्स्य प्रजाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर

Eknath Shinde Resign : एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांचा राजीनामा; १४ व्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार

Fodder Crop Cultivation : पोषक चारा उत्पादनाचे नियोजन...

SCROLL FOR NEXT