वाशीम ः जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद व खडकी (सदार) येथे जनावरांना ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) झालेला असून, वाकद येथील गुरांचे नमुने पॉझिटिव्ह (Lumpy Skin Report Positive) आल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात सर्वत्र होण्याची शक्यता पाहता जिल्ह्यातील गुरांच्या बाजारामध्ये (Livestock Market) बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरे पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. याशिवाय गुरांचे आठवडी बाजार, पशुप्रदर्शन व बैलगाडी शर्यतीवर (Bullock Cart Race) बंदी घालण्यात आली आहे.
जनावरांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास संबंधित जनावरांच्या मालकांनी, संबंधित नागरिकांनी तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी-कर्मचारी यांना या आजाराबाबत लक्षात आणून द्यावे. कोणीही जाणूनबुजून माहिती लपविल्याचे लक्षात आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालये,तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, पशुधन विकास अधिकारी (पंस) यांनी नियोजन करून लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.