colostrum feeding
colostrum feeding Agrowon
काळजी पशुधनाची

वासराला चिक पाजावा का?

Team Agrowon

वासराच्या (calf) उत्तम, निरोगी वाढीसाठी वासराचा प्रथम आहार म्हणजे गायीचा चिक होय. वासराचा जन्म झाल्यानंतर त्याला स्वतःची रोगप्रतिकारशक्ती नसते. वासराचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्याचे पोट रवंथ (rumination) करण्यासाठीही तयार झालेले नसते. अशा वेळी वासराला चिक पाजल्यास, ते आतड्यांमध्ये उत्तम प्रकारे शोषले जाते. उशिरा चीक पाजल्यास वासराची अँटीबॉडीज (antibodies) शोषूण घेण्याची क्षमता कमी होत जाते.

चिक पाजल्याने वासराला उत्तम प्रकारची रोगप्रतिकारशक्ती मिळत असते. मादी वासरे असल्यास भविष्यात चांगल्या वंशावळीच्या गायी गोठ्यातच तयार होऊ शकतात. चिक वासराला जन्मानंतर पहिल्या 24 तासात दोन ते तीन वेळा विभागून पाजल्यास, चांगला फायदा दिसून येतो.

चिकातील इम्युनोग्लोब्युलीन वासराच्या आतड्यामार्फत थेट रक्तप्रवाहामध्ये शोषला जातो. या रोगप्रतिकारक घटकांमुळे वासराला सुरुवातीच्या काळात न्युमोनिया, सांसर्गिक फुफ्फुसदाह यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. सुरुवातीच्या वासराचे विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी चिक एक चांगला पर्याय आहे.

वासराला चिक पाजताना वासराचे वजन, चिकाची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. सर्वसाधारणपणे गायीच्या वासराला चिक पाजताना, तो वासराच्या वजनाच्या १० टक्के या प्रमाणात पाजावा. म्हशीचे रेडकू असल्यास, त्याच्या वजनाच्या १५ टक्के या प्रमाणात चिक पाजावा. चिक पाजताना तो विभागून पाजावा.

चिक पाजल्याने, वासरू निरोगी, सुदृढ राहून, चांगली वजनवाढ मिळते. परिणामी वासरू लवकर वयात येऊन प्रजननास योग्य बनते. चिकामध्ये जीवनसत्त्व- अ चे प्रमाण दुधापेक्षा १० ते १५ पटीने जास्त असते. चिकट प्रथिने देखील ५ ते ७ पटीने जास्त असतात. इतरही खनिजे, तांबे, लोह, मॅग्नेशियम अणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. जे वासराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT