बच्चू कडू म्हणाले, जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाजूने निर्णय घेतला नाही, तर आम्ही रेल्वे गाड्या थांबवूते आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणारकर्जमाफी मिळेपर्यंत लढा थांबणार नसल्याचा इशारा.Farmers protest Nagpur: संपूर्ण सरसकट कर्जमाफी, रोजगार हमी योजनेत शेतीकामांचा समावेश करावा तसेच दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन सुरुच आहे. बच्चू कडू कर्जमाफीवर ठाम असून आमचे आंदोलन सुरुच राहील. जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाजूने निर्णय घेतला नाही, तर आम्ही संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करु, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. ."माझे मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे झाले आहे. सरकार कर्जमाफीबद्दल बोलले आहे, पण त्यांनी तारीख दिलेली नाही. गुरुवारी आम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटून तारीख ठरवू. तोपर्यंत, आंदोलन सुरूच राहील. आता, आम्ही पूर्वी ठरविलेल्या ठिकाणी (मैदानावर) आमचे आंदोलन सुरूच ठेवू. जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाजूने निर्णय घेतला नाही, तर आम्ही रेल्वे गाड्या थांबवू." असे बच्चू कडू यांनी बुधवारी रात्री आपली भूमिका स्पष्ट केली. .Bacchu Kadu: लोकन्यायालयाचा निर्णय मानणार: बच्चू कडू.नागपूरमध्ये बुधवारी शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. ते आज (दि. ३०) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पण शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. .Bacchu Kadu Live : न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले; आंदोलनावर मात्र ठाम .दरम्यान, “जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळासोबत बुधवारी (दि.२९) प्राथमिक चर्चा झाली. यावेळी कर्जमाफीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. आज (दि.३०) याबाबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. जर या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ३१ ऑक्टोबर रोजी रेल रोको आंदोलन उभे राहील आणि संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करण्यात येईल!”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे..आमचे आंदोलन सुरूच आहे. शेतकऱ्यांचा निर्धार अधिक ठाम झाला आहे. कर्जमाफी मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असे कडू यांनी म्हटले आहे. शेतकरी रस्त्यावर बसून आहेत. फडणवीस साहेब आता तरी जागे व्हा. कर्जमाफीचा निर्णय जाहीर करा, अशी मागणी कडू यांनी केली आहे..या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेजमजूर, कष्टकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ बांधवांचा समावेश आहे. त्यांनी दोन दिवराांपासून नागपूर- वर्धा, जबलपूर- हैदराबाद यासह चार महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.