Identify symptoms of pinnas disease in animals  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : ओळखा जनावरांतील पिन्नस आजाराची लक्षणे

पावसाळ्यात दमट आणि ओलसर वातावरणामुळे गोगलगायींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. याच काळात गोगलगायींमुळे जनावरांमध्ये गोगलगायींपासून पिन्नस आजार होण्याचा धोका वाढतो.

Team Agrowon

पावसाळ्यात दमट आणि ओलसर वातावरणामुळे गोगलगायींचा प्रादुर्भाव (Snail Attack) जास्त प्रमाणात असतो. याच काळात गोगलगायींमुळे जनावरांमध्ये गोगलगायींपासून पिन्नस आजार (Pinnas Disease) होण्याचा धोका वाढतो. मुख्यतः विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये या रोगाची लागण जास्त प्रमाणात अढळून येते. पिन्नस हा आजार गाय आणि बैलांमध्ये सिस्टोसोमा नेसॅली नावाच्या चपटकृमीमुळे होतो. हे परजिवी नाकातील रक्तवाहिन्यांमध्ये असतात. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने या रोगाची लक्षणे,  प्रसार आणि उपाय याविषयी पुढील माहिती दिली आहे. 

रोगाची लक्षणे कोणती आहेत ?

नाकामध्ये मांसल वाढ होते. त्यामुळे श्वसनाला त्रास होतो. 

जनावराच्या जवळ उभे राहिल्यास घोरण्याचा स्पष्ट आवाज येतो.  

श्वसनाला त्रास होत असल्यामुळे बैलाची काम करण्याची शक्ती कमी होते. 

गायींमध्ये दुधाचे प्रमाण कमी होते. 

जनावराची वाढ खुंटते. 

प्रसार कसा होतो ?

- तळ्यातील किंवा पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी गोगलगायी (एन्डोप्लेनॉरबिस एक्यूटस) मध्ये या परजिवींचे जंतू तयार होतात. हे जंतू गोगलगायींपासून पाण्यामध्ये प्रवेश करतात. 

- जनावरे पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर पाण्यावाटे किंवा जनावराला जखमा झालेल्या असतील तर जखमांवाटे हे जंतू जनावरांच्या शरिरात प्रवेश करतात. नंतर या जंतूची जनावरांच्या नाकपूडीच्या रक्तवाहीन्यांमध्ये वाढ होते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी जनावरांना तळ्यावर किंवा अनोळखी ठिकाणी पाणी पिण्यासाठी नेऊ नये. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT