Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’बाधित ३५५ जनावरे रोगमुक्त

गेले काही दिवस ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र आता केलेल्या उपाययोजनांचे परिणाम समोर येऊ लागले.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon
Published on
Updated on

अकोला ः गेले काही दिवस ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) वाढल्याने जिल्ह्यात पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र आता केलेल्या उपाययोजनांचे परिणाम समोर येऊ लागले. जिल्ह्यात बाधित जनावरांपैकी सुमारे ३५५ जनावरे ‘लम्पी स्कीन’मुक्त (Lumpy Disease Free Animal) झाल्याचे दिलासादायक वृत्त आहे. जिल्ह्यात या आजाराने ८३४ जनावरे बाधित (Lumpy Infected Animal) झालेली आहेत.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : चंदगड तालुक्यात पशुवैद्यकांची वानवा

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव अकोला व अकोट तालुक्यांत आढळून आल्यानंतर यंत्रणा खळबळून जागे झाली होती. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त, या खात्याचे मंत्री तसेच विविध अधिकाऱ्यांनी वारंवार बाधित गावांमध्ये भेटी देऊन उपाययोजनांबाबत आढावा घेतला.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : दीडशे जनावरांना टोचली ‘लम्पी’ ऐवजी भलतीच लस

पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात एक लाख ६५ हजार २०० लसमात्रा वितरित झाल्या. ८३४ बाधित जनावरांपैकी ३५५ जनावरे रोगमुक्त झाली. अद्यापही ४७२ जनावरे बाधित आहेत. बाधित जनावरे ज्या गावांत आढळली त्या गावांच्या पाच किलोमीटर परिसरात लसीकरण होत आहे. अशी ५७ गावे असून या गावांच्या परिसरातील सुमारे ५८ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

बाधित जनावरांचे दूध सुरक्षित

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘लम्पी स्कीन’ हा रोग बहुतांश गो वर्गातील जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचा रोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू देवी विषाणू गटातील कॅप्री पौक्स या प्रवर्गात मोडतात. त्याचा प्रादुर्भाव सर्व वयाच्या पशूंना होत असून, लहान वयाच्या पशूंना रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. हा जनावरांपासून माणसामध्ये संक्रमित होत नाही. त्यामुळे मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. तसेच बाधित जनावरांच्या दुधामुळे या आजाराचा संसर्ग होत नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. दूध उकळून घेतल्यावर लम्पी आजाराचा विषाणू उच्च तापमानाला जिवंत राहत नाही. या आजाराबाबत सामाजिक माध्यमाद्वारे चुकीची माहिती पसरविल्या जात असून अशा अफवावर विश्‍वासू ठेवू नये. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण वेगाने सुरू आहे. ‘लम्पी स्कीन’ आजाराची जनावरात लक्षणे दिसून येताच पशुपालकाने तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. यंत्रणा पुढील उपाययोजना करतील.

- डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com