Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal care : जनावरांसाठी युरोमोल चाटण वीट कशी तयार करावी?

युरोमोल चाटण विटेमध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थांसह खनिजमिश्रणे आणि जीवनसत्त्वांचे योग्य प्रमाण असते. हे कोठीपोटातील सूक्ष्मजिवांना नायट्रोजनचा पुरवठा करतात.

Team Agrowon

गाई, म्हशींचे उत्तम आरोग्य आणि जास्त दूध उत्पादनासाठी (milk production) संतुलित पशुआहार देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने वाळलेला चारा दिला जातो. वाळलेल्या चाऱ्यामध्ये पोषकघटक आणि नायट्रोजनचे प्रमाण कमी असते.

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये कोठीपोटातील सूक्ष्मजीव नायट्रोजनपासून प्रथिने तयार करतात.त्यामुळे आहारात फक्त वाळलेला चारा असलेल्या जनावरांना पूरक आहार म्हणून गव्हाणीमध्ये युरोमोल (euromol brick) चाटण वीट टांगून ठेवावी.

असे केल्याने जनावरे आवश्‍यक तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्यांची पूर्तता करून घेतात.  

युरोमोल चाटण वीट     

युरोमोल चाटण विटेमध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थांसह खनिजमिश्रणे आणि जीवनसत्त्वांचे योग्य प्रमाण असते. हे कोठीपोटातील सूक्ष्मजिवांना नायट्रोजनचा पुरवठा करतात.

सूक्ष्मजीव त्यापासून उत्तम प्रतीची प्रथिने तयार करतात. हे सूक्ष्मजीव मेल्यानंतर लहान आतड्यात त्यांचे विघटन होते. त्यापासून जनावरांना प्रथिने व अमिनो आम्ल मिळतात.       

युरोमोल चाटण वीट बनविण्याची पद्धत 

मोठ्या भांड्यात ४० किलो मळी घ्यावी. त्यामध्ये ५ किलो मीठ व १० किलो युरिया व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यावा.

हे मिश्रण १२ तासांसाठी तसेच ठेवावे. त्यानंतर गव्हाचा भुसा, तांदूळ पॉलीश आणि खनिज मिश्रणे त्यामध्ये मिसळावीत. सर्व घटक व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यावे.

तयार झालेले एकजीव ओले मिश्रण लाकडी चौकटीत टाकून वरून लाकडी फळीच्या साहाय्याने दाब द्यावा.

तयार झालेली युरोमोल चाटण वीट कठीण होण्यासाठी २४ तास सुकण्यासाठी ठेवावी. त्यानंतर ही चाटण वीट गव्हाणीत टांगून ठेवावी.

चाटण विटेचे फायदे 

जनावरांची भूक वाढते, चारा चांगला पचतो, दूध उत्पादनात वाढ होते.

जनावरे चांगला माज दाखवतात.

निकृष्ट चाऱ्याची पोषणमूल्ये वाढवली जातात.चाऱ्याची पचनियता वाढते.

जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

जनावरे लवकर गाभण राहतात.त्यामुळे दोन वेतांमधील अंतर कमी होते.

गाभण जनावरांना खाऊ घातल्यास मजबूत व निरोगी वासरे जन्माला येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT