Satara News: ऊसाच्या उत्पादनखर्चात दरवर्षी मोठी वाढ होऊनही हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनांकडून होणाऱ्या उग्र आंदोलनांच्या रेट्यातून बोध घेत यंदा कारखान्यांनी सुरूवातीलाच एफआरपीचा विचार करत ३५०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच पहिला हप्ता जादा मिळणार आहे..ऊसाच्या उत्पादन खर्चात दरवर्षी मोठी वाढ होते. त्या तुलनेत ऊसाला हमीभाव मिळत नाही. या विषयावरून शेतकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. केंद्र सरकारला त्यांची दखल घ्यावी लागली. त्याचा परिणाम ऊसाच्या एफआरपी वाढीत झाला. दरवर्षी एफआरपीत १०० ते २५० रुपयांनी वाढ होत आहे. यंदा मात्र यंदा कारखान्यांनी शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची वाट न बघता एफआरपीचा विचार करूनच सरासरी ३५०० रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे..साखर कारखान्यांच्या इतिहासात पहिला हप्ता जादा मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री, कृष्णा, रयत, जयवंत शुगर्स आदी कारखान्यांनी पहिला हप्ता ३५००, तर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने पहिला हप्ता ३ हजार रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनाही त्याच तोलामोलाचा दर द्यावा लागणार आहे..Sugarcane Rate: ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळेच सांगलीत कारखान्यांकडून ऊसदर जाहीर.साखर कारखान्यांच्या गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगाम सुरु करतानाच ऊसचा पहिला हप्ता जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून नेहमीच केली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अपवाद वगळता त्याला अनेक कारखानदारांनी फाटाच दिला आहे. यंदा मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने ऊसाचा पहिला हप्ता ३ हजार देण्याची घोषणा गळीत हंगामाच्या प्रारंभीच केली. त्यानंतर रयत अथणी शुगर्सने ३५०० रुपये पहिला हप्ता जाहीर केला. त्यामुळे इतर कारखान्यांनाही तोच दर जाहीर करावा लागला. त्यानुसार कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने ३५०० दर जाहीर केला. त्यानंतर लगेचच सह्याद्री कारखान्यानेही तोच दर जाहीर केला..त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्यातील कारखान्यांनी ३ हजार ते ३५०० रुपये पहिला हप्ता जाहीर केल्याने जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनाही त्याच दरम्यानचा दर जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादकांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत..Sugarcane FRP: चाळीस कारखान्यांनी थकवली ‘एफआरपी’.कमी उतारा असणाऱ्या कारखान्यांना बंधनकेंद्र सरकारने यंदा ऊसाची एफआरपी ३५५० रुपये जाहीर केली आहे. मागील वर्षी ती ३४०० रुपये होती. यंदा १५० रुपये जादा मिळणार आहेत. मात्र ज्या साखर कारखान्यांचा उतारा हा साडेनऊ रिकव्हरीपेक्षा कमी असणार आहे, त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याचा विचार करून कोणतीही कपात न करता ३२९० रुपये थेट शेतकऱ्यांना देण्याचे बंधन केंद्र सरकारने साखर कारखान्यांना घातले आहे..कारखान्यांनी यंदा जाहीर केलेला पहिला हप्ताकृष्णा सहकारी कारखाना - ३५००सह्याद्री सहकारी कारखाना - ३५००रयत- अथणी शुगर्स कारखाना - ३५००जयवंत शुगर्स कारखाना - ३५००बाळासाहेब देसाई कारखाना - ३०००.जिल्ह्यातील आतापर्यंतचा सरासरी ऊसदर२०२१- २२ - २९५०२०२२- २३ - ३०५०२०२३- २४ - ३१५०२०२४- २५ - ३२५०२०२५- २६ - ३५००.२०१९ पासून वाढलेली एफआरपी (प्रतिटन)२०१९ २० २७५०२०२० २१ २८५०२०२१ २२ २९००२०२२ २३ ३०५०२०२३ २४ ३१५०२०२४ २५ ३४००२०२५ २६ ३५५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.