Goat Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : यशस्वी शेळीपालनासाठी कशा शेळ्या निवडाल?

Goat Sellection : शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी आणि बोकड यांच्यावर अवलंबून आहे. म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळीची निवड करताना आपला मूळ हेतू कोणता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.

Team Agrowon

Goat Rearing : शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी आणि बोकड यांच्यावर अवलंबून आहे. म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळीची निवड करताना आपला मूळ हेतू कोणता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.

मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे असेल तर जन्मतः जास्त वजनाची करडे देणारी, एका वेतात जास्त करडे देणारी, झटपट वजन वाढणाऱ्या मादी आणि नराची निवड करावी. दुधासाठी पैदास करायची असल्यास दूध देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. संगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेळ्याची निवड करताना काय काळजी घ्यावी या विषयी पुढील माहिती दिली आहे.

- शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली शेळी विकत घेणे चांगले असते.

- जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.

- दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी. चपळ असावी.

- शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा, हेही महत्त्वाचे लक्षण आहे.

- केस मऊ आणि चमकदार असावेत. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा जास्त करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.

शक्‍यतो एक ते दोन वर्षे वयाचीच म्हणजेच दोन ते चार दाती शेळी विकत घ्यावी. शेळीचे पाय सरळ, पिळदार आणि खूर उंच असावेत. चरताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो.

- शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. शेळीला कासदाह रोग नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात.

- निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजिवी कीटकांपासून मुक्त असावेत.

--------------

माहिती आणि संशोधन - संगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT