Team Agrowon
जन्माला आलेल्या करडाचे योग्य पालन-पोषण करण्यासाठी त्यांच्या नोंदी ठेवणे गरजेचं आहे.
नोंदीवरून त्यांना वजनाच्या प्रमाणात किती आहार दिला पाहिजे आणि दिलेल्या आहारात त्यांची भूक भागली जाते का? आहारानुसार त्यांच्या वजनात किती वाढ होते? या सर्व गोष्टींची नोंद ठेवण गरजेचं आहे.
करडाचा जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांच्या कानात ओळख क्रमांक असलेला बिल्ला टोचावा. या क्रमांकामुळे करडाची जन्मापासूनची नोंद ठेवणे सोयीचे जाते.
बिल्ला करडाच्या कानात मारून घ्यावा. बिल्ला कानात टोचताना कानाच्या शिरा दबल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
करडे तीन महिन्याची होईपर्यंत दर १५ दिवसांनी आणि नंतर दर महिन्याला करडाच्या वजनाची नोंद करावी.
बिल्ला क्रमांक, जन्मतारीख, नर/मादी या गोष्टीच्या नोंदी ठोवाव्यात.
जन्मप्रकार म्हणजे करडे एकटे/ जुळे / तिळे जन्माला आलेत, लसीकरणाची नोंद, करडाचे जन्मतः वजन य़ा सर्व घटकांची नोंद ठेवावी. वजनाची तारीख आणि वजन हे दर १५ दिवसांनी आणि महिन्यांनी नोंदवावे.
Goat Milk : प्रतिकारशक्ती वाढविणारे शेळीचे दूध अनेक आजारावर गुणकारी