जनावर व्यायल्यानंतर वार किंवा झार अडकण्याचे प्रकार घडतात. खरं तर जनावर व्यायल्यानंतर वार सहा ते आठ तासांच्या आत बाहेर पडणं आवश्यक असतं. पण अनेकदा वार अडकते. त्याचं मुख्य कारण म्हणजे जनावरांमध्ये संप्रेरकांचं प्रमाण कमी असणे. तसेच शस्त्रक्रिया करून वासरू काढणे, गर्भाशयात पीळ पडणे अशा विविध कारणांमुळे जनावरांमध्ये वार अडकण्याची समस्या निर्माण होते.
वासराचा जन्म झाल्यानंतर वारेचे कार्य संपते. कारण वार हा गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव असतो. वासरू बाहेर आल्यानंतर शरीराकडून वारेस होणारा रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे वारेच्या पेशी निर्जीव होतात. त्यातील पाण्याचा अंश कमी झाल्यानं वार अंकुचन पावते. वारेचा गर्भाशयाशी संपर्क तुटून ती लांबते. वासराच्या वजनामुळे आणि गर्भाशयाच्या कळामुळे शेवटी वार बाहेर पडते.
काही वेळेस जनावरांमध्ये असलेल्या अनुवंशिक गुणधर्मामुळे वार बाहेर पडत नाही. पहिलारू कालवड तसेच वयस्कर जनावरांमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते. जनावरांचा गाभण काळ पूर्ण होण्याआधीच वासराचा जन्म झाल्यास वार अडकू शकते. बरेचदा नर वासरू असल्यास वार अडकण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. विण्याचा कालावधी जवळ आलेली गाय किंवा म्हैस जास्त अंतर चालवत नेल्यास, योग्य प्रमाणात व्यायाम न दिल्यास वार अडकू शकते.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (NDDB) वार अडकण्याच्या समस्येवर नैसर्गिक घरगुती उपचारांची शिफारस केली आहे.
घरच्या घरी उपचार कसे करायचे ?
साहित्य - एक मुळा, दीड किलो भेंडी, आवश्यकतेनुसार गुळ आणि मीठ
- जनावर विल्यानंतर दोन तासाच्या आत एक मुळा खाऊ घालावा.
- आठ तासानंतरही वार पडला नसेल तर दीड किलो भेंडीचे दोन भागात काप करुन गुळ आणि मिठासोबत जनावराला खाऊ घालावी.
- १२ तासानंतरही वार पडला नसेल तर वाराच्या मुळाशी गाठ बांधून गाठीपासून तीन इंच खालून वार कापावा. गाठ योनीमार्गापर्यंत परत जाईल. हाताने वार काढण्याचा प्रयत्न करु नये. चार आठवड्यापर्यंत एक मुळा प्रत्येक आठवड्याला खाऊ घालावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.