पावसाळ्यात जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करावे?

बदलणाऱ्या ऋतुमानानुसार आपण मानवी आहारातही काही बदल करीत असतो. त्याच अनुषंगाने पशुपाल्कानी आपल्या गोठयातील जनावरांच्या आहारातही बदल करणे गरजेचे असते.
animal feed
animal feedAgrowon

बदलणाऱ्या ऋतुमानानुसार आपण मानवी आहारातही काही बदल करीत असतो. त्याच अनुषंगाने पशुपालकांनी आपल्या गोठयातील जनावरांच्या आहारातही बदल करणे गरजेचे असते. जनावरांचे पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन या विषयावर डॉ. पराग घोगळे (Dr. Parag Ghogle) यांच्याशी साधलेला हा संवांद.

1. पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून जनावरांच्या व्यवस्थापनात कोणते बदल केले पाहिजे ?

पावसाळी (Rainy season) वातावरणामध्ये हवेतील आद्रता वाढते. जमिनीतील ओलसरपणा, हवेतील विषाणू तसेच जिवाणूंचे प्रमाण देखील वाढीस लागते. यामुळे जनावरांना वेगवेगळे आजार होतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांचे लसीकरण करून घेतले पाहिजे. जंतनिर्मुलन वेळोवेळी करावे. उपद्रवी माश्या, गोचीड, कीटक यांना अटकाव केला पाहिजे. जनावरे बसण्याची जागा ओलसर असल्यास त्यांना दगडी कास हा आजार होण्याची शक्यता असते.अशा दुधाळ जनावरांचे (milking animals) सड नियमितपणे टीट डीप मध्ये बुडवून घ्यावेत किंवा दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर कास जंतुनाशक द्रावणाने धुऊन घ्यावी. गोठ्यामध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी आठवड्यातून एकदा केली पाहिजे. गोठ्यात पाणी गळत असल्यास गोठ्याची डागडुजी वेळेत केली पाहिजे. जनावरांच्या मलमुत्रातून बाहेर पडणाऱ्या अमोनिया वायुचे निस्सरण झाले पाहिजे. मुक्त संचार गोठ्यात पावसाळ्यात जमीन ओली, भुसभुशीत झाल्याने जनावरे घसरू शकतात, जनावरांच्या खुरांना जखम होऊ शकते. जनावरांच्या खुरांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.

animal feed
असा असावा जनावरांचा गोठा !

2.पावसाळ्यात कोरड्या चाऱ्याची साठवणूक, त्याचे व्यवस्थापन कशे करावे?

जनावरांमध्ये रवंथ व्यवस्थित होण्यासाठी कोरडा चारा गरजेचा आहे. आपल्याकडे जानेवारी ते मार्च या काळात कोरडा चारा उपलब्ध होत असतो. या काळात अधिक प्रमाणात कोरडा चारा व्यवस्थितरित्या साठवून त्याचा वापर पावसाळ्यात करावा.

animal feed
जनावरांचा गोठा बांधताना या गोष्टी लक्षात ठेवा! | cow shed Construction | ॲग्रोवन

3.पावसाळ्यात पशुपालकांना चिखलातून ओल्या चाऱ्याची ने-आण करावी लागते यावर उपाय म्हणून आपण की सांगाल ?

मागील वर्षी पाऊस अधिक प्रमाणात पडला, हिरव्या चारा जनावरांना न दिल्याने दूध उत्पादनात घट झाली. पावसाळा सुरु होण्यापुर्वीच पशुपालकांनी मुरघास बनवून घ्यावे.मुरघास तयार होण्यासाठी साधारणपणे ४० ते ४५ दिवसाचा कालावधी लागतो.

4. जनावरांच्या आहारात बदल करत असताना ते कसे केले पाहिजे ?

पावसाळ्यात वातावरणातील थंडपणा वाढतो, थंड हवामानात जनावरांना अधिक उर्जा लागते. अशा वेळी जनावरांना अतिरिक्त कोरडा चारा दिल्यास या चाऱ्याचे जनावरांच्या पोटामध्ये ज्वलन होते. या ज्वलनामुळे गायी म्हशींना त्यांचे शरीर गरम ठेवण्यासाठी उर्जा मिळते. त्यामुळे जनावरे वातावरणाशी सहजरीत्या जुळवून घेतात. यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात कोरड्या चाऱ्याचा समावेश केला पाहिजे. अतिरिक्त उर्जा असणारा मका भरडा, गहू, बाजरीचा भरडा यांसारखा उर्जायुक्त पशुआहार जनावरांच्या आहारामध्ये अर्धा ते एक किलो वाढवावा. बायपास फट १०० ग्रॅॅम द्यावा.त्यामुळे दूध उत्पादन टिकून राहते.

5.हिरव्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात किती प्रमाणात समावेश करावा ?

हिरव्या चाऱ्यामध्ये ८० ते ८५ टक्के पाणी असते. हिरव्या चाऱ्यातून जनावरांना कमी प्रमाणात शुष्क पदार्थ मिळतात. जनावरांचे पोट भरल्यानंतरच ते रवंथ करु लागते. हिरव्या चाऱ्याचा अधिक प्रमाणात समावेश केल्याने जनावरांचे शेण पातळ पडते. दुधातील घन पदार्थाचे प्रमाण कमी होते.म्हणून हिरव्या चाऱ्याबरोबर कोरडा चारही समप्रमाणात गरजेनुसार द्यावा.

6.जनावरांच्या आहारात कोरडा व ओला चारा तसेच पशुखाद्य व क्षार मिश्राणांचा समावेश किती प्रमाणात केला पाहिजे?

गायी म्हशीला त्यांच्या दूध उत्पादनाच्या क्षमतेनुसार आणि वजनानुसार आहारात बदल केला पाहिजे. ४०० ते ५०० किलोची गाय जर १५ ते २० लिटर दूध उत्पादन देत असेल तर एकूण वजनाच्या तीन टक्के शुष्क पदार्थ दिला पाहिजे. जसे किलो २० किलो हिरव्या चाऱ्यातून २ किलो शुष्क पदार्थ आणि १० किलो मुरघास मधून अडीच ते तीन किलो शुष्क पदार्थ मिळतो. एक किलो पशुखाद्यातून ९०० ग्रम शुष्क पदार्थ मिळतो. कोरडया चाऱ्यातून ९० टक्के शुष्क पदार्थ आणि १० टक्के पाणी मिळत असतो. एका गायीला दिवसातून ६ ते ७ किलो पशुखाद्य, २० ते २२ किलो हिरवा चारा किंवा १५ ते १६ किलो मुरघास, ५ ते ६ किलो कोरडा चारा एका दिवसातून दोनवेळा विभागून द्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com