Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ रोखण्यासाठी अकोल्यात खासगी पॅरावेटची मदत

अकोला ः जिल्ह्यात लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी खासगी पॅरावेटची मदत घेण्यात आली असून शनिवार (ता.१७) पासून त्यांच्या मदतीने लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) विचारात घेता यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी खासगी पॅरावेटची (Help Of Private Paravet For Lumpy Skin) मदत घेण्यात आली असून शनिवार (ता.१७) पासून त्यांच्या मदतीने लसीकरण (Lumpy Skin Vaccination) सुरू करण्यात आले आहे. तालुकास्तरावर तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार असून पॅरावेट धारकांनी आपल्या भागात युद्धस्तरावर लसीकरण राबवून लम्पीस्कीन नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनावरांचे लसीकरण वाढविण्यासाठी त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जी.एम. दळवी, आदी उपस्थित होते.

कटियार म्हणाले की, जिल्ह्यात लम्पी स्कीनवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. लसीच्या मात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने नियुक्त करण्यात आलेल्या खासगी पॅरावेट यांनी युद्धस्तरावर मोहीम राबवावी. लम्पी रोगाचा फैलाव इतर ठिकाणी होणार नाही यासाठी पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करीत उपाययोजना राबवावी. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचे विलगीकरण करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने औषधोपचार करावा. जनावरांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्या, असे आवाहन या वेळी केले.

५८ हजार जनावरांचे लसीकरण...

पशुसंवर्धन विभागामार्फत एक लाख ६५२०० लसीच्या मात्रा उपलब्ध झाल्या असून आतापर्यंत ५८हजार २८ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये ५७ इपिसेंटर असून ८३४ बाधित जनावरांपैकी ३५५ जनावरे बरी झाली आहेत. तर ४७२ सक्रिय लम्पी स्कीन पशुरुग्ण आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT