Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुक्‍त होण्याच्या मार्गावर गोंदिया जिल्हा

राजस्थान, पंजाब, गुजरात व त्यानंतर महाराष्ट्रात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढीस लागला होता.

Team Agrowon

Gondiya News : जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin) २५० जनावरे बाधित झाली होती. उपचारांती २३३ जनावरे बरी झाली, तर ग्रस्त जनावरे अवघी दोन उरली आहेत.

त्यामुळे जिल्हा लवकरच ‘लम्पी’मुक्‍त होण्याच्या मार्गावर असून, १५ मृत जनावरांच्या मालकांना एक लाख ३५ हजार रुपयांचे अनुदान (Subsidy) वितरित करण्यात आले.

राजस्थान, पंजाब, गुजरात व त्यानंतर महाराष्ट्रात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढीस लागला होता. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये याची तीव्रता वाढीस लागली. मृत जनावरांची संख्यादेखील त्या भागात अधिक होती.

गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्‍यांत लम्पी स्कीन रोगामुळे २५० जनावरे बाधित झाली होती. पशुसंवर्धन विभागाने त्यानंतर तत्काळ लसीकरणासाठी पुढाकार घेतला. २,९१,६४८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात एकूण जनावरांची संख्या ३,८५,१५४ इतकी आहे.

त्यामध्ये गायवर्गीय २,९२,६२७, तर म्हैस वर्ग १२,५२७ याप्रमाणे आहे. पशुसंवर्धन विभागाने त्यानंतर बाधित २५० जनावरांच्या उपचारावर लक्ष केंद्रित केले. उपचाराअंती २३३ जनावरे बरी झाली.

उर्वरित २ जनावरे बाधित असून, लवकरच जिल्हा लम्पी स्कीन प्रादुर्भावमुक्‍त होण्याच्या मार्गावर असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे १५ जनावरांचा मृत्यू झाला. या मृत जनावरांच्या मालकांना एक लाख ३५ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली.

दरम्यान, जनावरांना रोगमुक्‍त ठेवायचे असल्यास पशुपालकांनी आठवड्यातून एकदा फवारणी करून गोठ्याचे निर्जतुकीकरण करावे. गोचिड, गोमाश्‍या निर्मूलनाकरिता ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

पशुसंवर्धन विभागाची स्थिती

पशुवैद्यकीय कर्मचारी- २७

सहायक पशुधन अधिकारी- ९

पर्यवेक्षक - ३१

पशुधन वैद्यकीय विकास अधिकारी रिक्‍तपदे - २६

पर्यवेक्षकांची पदे- ९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT